महाराष्ट्र राज्य मार्ग परिवरन महामंडळाचे विभाग नियंत्रकांना आदेश
मुंबई: एसटी चालक तसेच वाहक कामावर असतना गणवेश परिधान न करणे, मद्यप्रशासन करुन गाडी चालविणे सारख्या तक्रारी वाढत असल्याने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने विभाग नियंत्रकांना चालक आणि वाहकांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसे असल्यास कारवाई करण्याचे संकेतही देण्यात आले आहेत.
एसटी महामंडळ चालक वाहकांकडे लक्ष दिले आहे. यातून चालक किंवा वाहक कामावर असताना गणवेश परिधान न करणे किंवा मद्यप्राशन करुन गाडी चालवण्या सारख्या घटना वारंवार घडत असल्याचे निदर्शनास आले आहे. यातून राज्य परिवहन महामंडळाच्या सुरक्षित प्रवास या प्रतिमेला तडा जात असल्याच्या तक्रारी होत आहेत. वारंवार सुचना देऊनही अशा घटनांची वारंवार घडत आहेत. ही बाब गंभीर असून अशा घटना पुन्हा होऊ नयेत म्हणून सुचना देण्यात येत आहेत. तसेच त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेतही देण्यात आले असल्याचे एसटीच्या महाव्यवस्थापक वाहतूक शाखेकडून सांगण्यात आले.