@maharashtracity

मुंबईत दिवसभरात २२५ रुग्ण

मुंबई: राज्यात आज १०७८ नवीन रुग्णांची नोंद ( corona active case) झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,१२,९६५ झाली आहे. काल राज्यात १,०९५ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६४,५३,५८१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले.

यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.५९% एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण १५,४८५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यात आज ४८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर ( Death rate) २.१२% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,२८,४३,७९२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,१२,९६५ (१०.५२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

Also Read: पर्यटकांसाठी ३ नोव्हेंबरपासून बेस्टची ओपन डेक बससेवा

सध्या राज्यात १,९१,४९७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये ( home quarantine) आहेत तर ९१९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये ( corona centres) आहेत.

मुंबईत दिवसभरात २२५:

मुंबईत ( mumbai) दिवसभरात २२५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. आता पर्यंत बाधित रुग्णांची संख्या ७५७२३२ एवढी झाली आहे. तर ३ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आता पर्यंत १६२५४ मृत्यूची नोंद करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here