@maharashtracity

मुंबई: राज्यात रविवारी ११७२ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,११,०७८ झाली आहे. आज १,३९९ रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर राज्यात आजपर्यंत एकूण ६४,५०,५८५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले.

यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.५७% एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण १६,६५८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान, राज्यात रविवारी २० कोरोनाबाधित (corona patients) रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,२६,६७,२११ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,११,०७८(१०.५५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १,६५,८२६ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये (home quarantine) आहेत. तर ८६७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबईत दिवसभरात ३०८

मुंबईत (Mumbai) दिवसभरात ३०८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या ७५६७४९ एवढी झाली आहे. तर ३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आतापर्यंत १६२४७ मृत्यूची नोंद करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here