@maharashtracity

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले

क्रांती रेडकर आणि ज्ञानेश्वर वानखेडे आठवलेंच्या भेटीला

मुंबई: केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Union MoS Ramdas Athawale) यांनी वानखेडे कुटुंबियांना पाठींबा दिला आहे. ’पिक्चर अभी बाकी आहे. कारण मी अजून पिक्चरमध्ये नाही. त्यामुळे पिक्चरमधील नावे बदलण्याचा प्रश्नच नाही. वानखेडे कुटुंब खरं बोलत असून माझा वानखेडे कुटुंबियांना पाठींबा आहे असे आठवले यांनी आज जाहीरपणे सांगितले

एनसीबीचे (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) विरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मंत्री नवाब मालिक (NCP spokesperson Nawab Malik) यांच्यातील वाद वाढत आहे. त्यामुळे वानखेडे यांचे वडील ज्ञानेश्वर वानखेडे आणि पत्नी क्रांती रेडकर (Kranti Redkar) यांनी रामदास आठवले यांची आज भेट घेतली.

समीर वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक गेल्या अनेक दिवसांपासून गंभीर आरोप करत आहेत. वानखेडे कुटुंबीयांनी पत्रकार परिषद घेत सर्व आरोप खोडून काढले.

वानखेडे कुटुंबीयांनी घेतलेल्या भेटीत रामदास आठवलेंनी समीर वानखेडे यांच्या कुटुंबीयांना आपल समर्थन असल्याच सांगितले आहे. आठवले म्हणाले, “मलिक हे समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबीयांची बदनामी करत आहेत. वानखेडे कुटुंबीय मुस्लीम नाहीत. त्यांनी सर्व कागदपत्रे मला दाखवली आहेत.”

समीर वानखेडे यांच्यावर खोटे आरोप करण्यात येत असून नवाब मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्ते पदाचा गैरवापर करत आहेत. मलिक यांच्या जावयाला तरूगांत टाकले म्हणून ते हे सर्व करत असल्याचेही आठवले यांनी सांगितले.

प्रभाकर साईल याला पैसे देऊन विरोधात बोलायला लावले आहे, असा दावा करून आठवले म्हणाले, वानखेडे यांच्याविरोधात आरोप असल्यास त्यांनी कोर्टात जावे.

मला भेटण्यासाठी सगळ्या जाती धर्माचे येत असतात. क्रांती रेडकर आणि ज्ञानेश्वर वानखेडे भेटले. तसेच नवाब मलिक सुद्धा आपल्याला भेटायला आल्यास हरकत नसल्याचे आठवले म्हणाले.

क्रांती रेडकर या चित्रपटात काम करत असून आपणही चित्रपटात काम करावे असे वाटू लागले आहे. काही दिवसांपूर्वी मालिक यांनी पिक्चर अभी बाकी आहे असे म्हटले होते. पिक्चर बाकी होते कारण मी अजून पिक्चरमध्ये नाही. पिक्चरमधील नावे बदलण्याचा विषयच नसून वानखेडे कुटुंब खरं बोलत असल्याचो निर्वाळा आठवले यांनी दिला.

नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांत कुठलंही तथ्य नसून समीर वानखेडे यांच्या विरोधात षडयंत्र रचल जात असल्याचंही आठवले यांनी सांगितले.

दरम्यान, रामदास आठवलेंची भेट घेतल्यावर आठवले यांना सर्व कागदपत्रे दाखवली आहेत. आमच्यासोबत रामदास आठवले आहेत. फ्रॉड कोण आहे हे लवकरच समजेल, असे क्रांती रेडकर म्हणाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here