व्हेरियंटचे जिनोमिक सिक्वेसिंग होणार 

@maharashtracity

मुंबई: राज्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचे  २१ प्रकरण आढळली असून यातील रत्नागिरी जिल्ह्यात ९ जळगावात ७,  मुंबईत २ तर पालघर, सिंधुदुर्ग आणि ठाणे असे प्रत्येकी एक असे २१ रुग्ण सापडले असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी दिली. 

या व्हेरियंटचे जिनोमिक सिक्वेन्सिंग करण्याचा निर्णय घेतला असून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील १०० नमुने घेण्याची कारवाई सुरु करण्यात आली असल्याचे टोपे यांनी सांगतले.    

दरम्यान व्हेरियंटच्या इंडेक्स केसेसची माहिती घेतली जात असून यात रुग्णांच्या प्रवासाची पार्श्वभूमी, रुग्णाने लस घेतली होती का, लस घेऊन देखील पुन्हा कोरोना संसर्ग झाला का, किंवा पुनः संसर्ग झाला का या बाबत माहिती घेण्यात येत आहे. 

या इंडेक्स प्रकरणाबाबत हाय रिस्क कॉन्टॅक्ट मधील प्रभावी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरु करण्यात आले आहे. यात आयएनआय आणि सारी आजाराचे संशोधन तपास सुरु झाले आहे. तसेच जिनोमिक सिक्वेन्सिंग मधून प्रत्येक जिल्ह्यातील १०० नमुने घेण्याची कारवाई सुरु करण्यात आली आहे. यासाठी सीएसआयआर आणि आयजीआयबी या संस्था सहभागी हॊत असून एनसीसीबी संस्थेचा देखील यात सहभाग आहे.

दरम्यान १५ मे पासून आज पर्यंत साडे सहा हजाराहुन अधिक नमुने घेण्यात आले असून या नमुन्याचे जिनोमिक सिक्वेन्सिंग करण्यात आले असल्याचे टोपे यांनी सांगितले. तसेच  डेल्टा प्लस बाबत तुलनात्मक माहिती घेण्यात येत असून डेल्टा प्लस व्हेरियंटचे संक्रमण झपाट्याने होत नाही. मात्र त्याची घातकता गंबीर आहे. मात्र हा व्हेरियंट लसीला जुमानत नाही का यावर अधिक माहिती अधिक नमुने तपासून समोर येण्याची शक्यता आहे. 
सोमवारी झालेल्या ग्रामीण पायाभूत आरोग्य सेवेबाबत बैठक घेण्यात आली. राज्याने डॅश बोर्ड चांगला बनवला असून कोरोना संबंधित सर्व माहिती यावर उपलब्ध होत आहे. यामुळे रुग्णांना मदत होऊ शकते. 

पाच टक्के तरी आरोग्य विभागावर खर्च व्हावा असे अपेक्षा ठेवण्यात आले आले आहे. आरोग्य बाबतचे सर्व मागण्या केंद्र समोर ठेवण्यात आले आहेत. पदांना , बांधकामांना मंजुरी मिळून गती प्राप्ती व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात येईल असे ठरले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here