@maharashtracity

मुंबई: राज्यात शनिवारी ३,२७६ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६५,४१,११९ झाली आहे. काल ३,७२३ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६३,६०,७३५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२४% एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण ३७,९८४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान राज्यात शनिवारी ५८ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,७९,९२,०१० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५,४१,११९ (११.२८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
सध्या राज्यात २,५९,१२० व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर १,४८३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत

मुंबईत दिवसभरात ४५५

मुंबईत दिवसभरात ४५५ नव्या कोरोना रुग्णांची (corona patients) नोंद करण्यात आली. आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या ७४०७६० एवढी झाली आहे. तर ५ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आतापर्यंत १६०७९ मृत्यूची नोंद करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here