@maharashtracity

मुंबई: राज्यात शुक्रवारी ३,६४३ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६४,२८,२९४ झाली आहे. काल ६,७९५ रुग्ण बरे होऊन घरी गेले.

राज्यात आजपर्यंत एकूण ६२,३८,७९४ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०५% एवढे झाले आहे. तर राज्यात आज रोजी एकूण ४९,९२४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान, राज्यात काल १०५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.११ % एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,२४,४५,६८९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४,२८,२९४ (१२.२६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

सध्या राज्यात ३,०२,८८८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये (Home Quarantine) आहेत तर २,४८७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबईत दिवसभरात २२५

मुंबईत (Mumbai) दिवसभरात २२५ नव्या कोरोना रुग्णांची (corona patient) नोंद करण्यात आली. आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या ७४१३८९ एवढी झाली आहे. तर ५ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आतापर्यंत १५९५१ मृत्यूची नोंद करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here