@maharashtracity

एकाचे नमुने जिनॉम सिक्वेसिंगसाठी प्रयोगशाळेत

मुंबई: ओमिक्रॉन वेरियंटच्या (Omicron variant) अनुषंगाने परदेशी प्रवाशांची कसून तपासणी केली जात असून १० ते ३० नोव्हेंबर या कालावधीत ४० देशांतून २८६८ परदेशी प्रवासी आले असल्याचे सांगण्यात आले. या २८६८ प्रवाशांतील ५०० जणांचे नमुने कोविड टेस्टसाठी पाठविण्यात आले.

या ५०० पैकी ४ जण कोविड पॉझिटिव्ह आढळून आले. यातील एक जण सहसंपर्कातील पॉझिटिव्ह असल्याचे सांगण्यात आले. या पॉझिटिव्ह चौघांपैकी एकाचे नमुने जिनॉम सिक्वेसिंगसाठी (Genome sequencing) पाठविण्यात आले असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.

दरम्यान, खबरदारी म्हणून १५ हजार ८०८ बेड ठेवण्यात आले आहेत. तर ६००० हजार बेड प्रस्तावित आहेत. तसेच एनएससीआय कोविड केंद्रात ५३० (NSCI Covid Centre), बीकेसी कोविड केंद्रात (BKC Covid Centre) २३२८ , तर नेस्को (NESCO) फेज २ मध्ये १५०० बेड सज्ज आहेत.

नेस्कोच्या फेज १ मध्ये २२२१ बेड सज्ज आहेत. मुलुंड मध्ये १७०८ आहेत. भायखळा येथे १००० बेड सज्ज आहेत. तर कांदरपाडा आणि दहिसर चेक नाका मिळून ७०० बेड, मालाड येथे २२०० बेड प्रस्तावित आहेत. कांजूरमार्ग येथे २००० हजार तर सायन चुनाभट्टी १५०० बेड तयार आहेत. ऑक्सिजन गरज ६९० ते ७०० मेट्रिक टन एवढी असताना ११२४ मेट्रिक टन ऑक्सिजन साठा असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here