@maharashtracity
मुंबई: राज्यात मंगळवारी ५,६०९ नवीन कोरोना रुग्णांची (corona patient) नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६३,६३,४४२ झाली आहे. मंगळवारी ७,७२० रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६१,५९,६७६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.८ % एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण ६६,१२३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
राज्यात मंगळवारी १३७ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१ % एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,९९,०५,०९६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३,६३,४४२ (१२.७५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
सध्या राज्यात ४,१३,४३७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,८६० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
मुंबईत दिवसभरात २३९
मुंबईत (Mumbai) दिवसभरात २३९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या ७३७९५४ एवढी झाली आहे. तर ५ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आतापर्यंत १५९५९ मृत्यूची नोंद करण्यात आली.