दिड वर्षात आग दुर्घटनांविरोधात कठोर पावले उचलण्याची गरज

राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेची मागणी

मुंबई: कोरोना काळापासून दिड वर्षात राज्यात रुग्णालयांमध्ये आग लागून आत्तापर्यंत ७७ निष्पाप रुग्णांचा मृत्यू झाले असल्याचे महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेचे सचिव भिमेश मुतुला ( Bhimesh Mutula, Secretary, Maharashtra State Rugnasevak and Shramik Kamgar Sangh) यांनी सांगितले.

सरकारने रुग्णालयांचे ऑडिट ( Hospital audit) करून हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे मागणी या संघटनेकडून करण्यात येत आहे.

करोनाचा प्रादुर्भाव ( corona pandemic) झाल्यापासून राज्यातील आरोग्य व्यवस्था ( State Health System) अधिक बळकट करण्यावर भर देण्यात येत असतानाच गेल्या दिड वर्षांत लागलेल्या आगी किंवा प्राणवायूच्या गळतीमुळे ( Fire and leakage of oxygen) राज्यात ७७ रुग्णांना नाहक जीव गमवावा लागला असल्याची खंत मुतुला यांनी यावेळी व्यक्त केली.

रुग्णालयांना आग लागण्याच्या घटना गंभीर असून त्वरीत दखल घेण्याची मागणी करण्यात येत आह.

राज्यात करोनाकाळात रुग्णालयांमधील दुर्घटना वाढल्याचे दिसून येईल. मुंबई भांडुपमधील ( bhandup) ड्रीम मॉल ( dream mall) इमारतीतील करोना केंद्राच्या आगीत ११ जणांचा मृत्यू झाले.

तर भंडारा सरकारी रुग्णालय ( bhandara government hospital) दुर्घटनेत १० बालकांचा होरपळून मृत्यू झाला. तसेच विरार ( virar) येथील रुग्णालयात १५ जणांचा मृत्यू झाले. तर मुंब्रा ( mumbra) खासगी रुग्णालयातील दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू झाले.

तसेच नागपूरमध्ये ( nagpur) खासगी रुग्णालय ४ जणांचा मृत्यू तर नगरच्या सरकारी रुग्णालयात ११ जणांचा आगीत मृत्यू झाले. दरम्यान नाशिक ( nashik ) मधील प्राणवायू टाकीची गळती होवून प्राणवायूचा पुरवठा खंडित झाल्याने २२ जणांचा मृत्यू झाला असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

यावर बोलताना राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेचे सचिव भिमेश मुतुला यांनी सांगितले की, रुग्णालयांमधील आगींचे प्रकार वाढल्याने ऊर्जा विभागाने (Department of Energy ) आदेश जारी करुन रुग्णालयातील वीजवाहन किंवा उच्च दाब यंत्रणेची जबाबदारी ही रुग्णालय प्रशासनावर सोपविण्यात आली. किती दाबाची वाहिनी असल्यास कोणते उपाय योजायचे याचे कोष्टक तयार केले.

रुग्णालयांमध्ये आग लागल्यास त्याची सारी जबाबदारी ही रुग्णालय प्रशासनाची असेल असे स्पष्ट केले. मात्र आदेश काढून सरकारी यंत्रणा मोकळ्या झाल्या.

मात्र रुग्णालयांकडून या आदेशाची अंमलबजावणी होते की नाही याची खातरजमा मात्र सरकारी यंत्रणांनी केली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.

त्यामुळे राज्य सरकार आरोग्य अधिकारी, जिल्हा रुग्णालय अधिकारी, पोलीस प्रशासन, अग्निशमन दलाचे अधिकाऱ्यांचे विशेष पथक तयार करून समिती नियुक्त करण्यात यावी अशी मागणी मुतुला यांनी केली आहे.

या समितीकडे संबंधित अधिकार देत ही संघटना स्वतंत्र राहून कामे करतील असे निवेदन महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेकडून मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here