देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार

@maharashtracity

नागपूर: कोरोना (corona) विषाणूच्या तिसर्‍या लाटेची शक्यता विचारात घेता नागपुरात (Nagpur) लहान बालकांसाठी 200 खाटांचे रूग्णालय सुसज्ज ठेवावे, अशी सूचना माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते (LoP) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महापालिकेला केली आहे. यासाठी आवश्यक ती सर्व मदत नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युटतर्फे (National Institute for Cancer ) करण्याची ग्वाही सुद्धा त्यांनी दिली. याशिवाय, म्युकरमायकोसिसच्या (mucormycosis) स्थितीचा सुद्धा त्यांनी या बैठकीतून आढावा घेतला.

संभाव्य तिसर्‍या लाटेची शक्यता विचारात घेता काय उपाययोजना केल्या आहेत आणि आणखी काय करता येईल, याबाबत फडणवीस यांनी महापालिकेत आढावा घेतला.

रूग्णालय उभारताना विविध वयोगट विचारात घेण्यात यावेत. अगदी लहान बालके असल्यास त्यांच्या पालकांची व्यवस्था सुद्धा करावी लागेल. अशा सूचना केल्या.

म्युकरमायकोसिस रूग्णांची नागपुरातील स्थिती, त्यासाठी केलेल्या उपाययोजना आणि संभाव्य तिसरी लाट विचारात घेता हाती घ्यावयाच्या उपाययोजना इत्यादींबाबत सविस्तर चर्चा या बैठकीत झाली. म्युकरमायकोसिसच्या रूग्णांचे स्क्रिनिंग लवकर व्हावे, म्हणजे वेळेत उपचार करून त्या रूग्णाला लवकर दिलासा मिळेल, अशी सूचना देवेंद्र फडणवीस यांनी केली.

कॉल सेंटरची स्थापना करून स्क्रिनिंगची आणि वेळेत उपचारांची योग्य स्ट्रॅटजी तयार करण्यात यावी, अशा पद्धतीचा निर्णय घेण्यात आला. पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध करून देत यासाठी ऑपरेशन थिएटर्सची संख्या वाढविण्याचा निर्णय सुद्धा यावेळी घेण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here