मुंबई
मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचं वयाच्या ७८ व्या वर्षी निधन झालं आहे. रवींद्र बेर्डे यांनी मराठीसह हिंदीतही काम केलं आहे. मराठी चित्रपटसृष्टीसाठी ही मोठी धक्कादायक बातमी आहे.
रवींद्र बेर्डे यांनी घशाचा कर्करोग झाला होता. गेल्या अनेक वर्षांपासून ते उपचार घेत होते. त्यांच्यावर टाटा रुग्णालयात उपचार सुरू होते. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन दिवसांपूर्वी त्यांना घरी सोडण्यात आले होते. मात्र अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचं निधन झालं. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुलं, सुना, नातवंड असा परिवार आहे.
लक्ष्मीकांत बेर्डे यांचे ज्येष्ठ बंधू म्हणूनही रवींद्र बेर्डेंची ओळख आहे. दोन्ही भावांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. रवींद्र यांच्या विनोदी भूमिका फार गाजल्या आहेत.
रवींद्र बेर्डे यांचे चित्रपट
एक गाडी बाकी आनाडी, खतरनाक, होऊन जाऊ दे, हमाल दे धमाल, चंगू मंगू, थरथराट, उचला रे उचला, धडाकेबाज, गंमत जंमत, झपाटलेला, भुताची शाळा, हाच सुनबाई चा भाऊ यांसारख्या गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केले होते. याशिवाय हिंदीतील सिंघमसारख्या चित्रपटात त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती.