@maharashtracity

१० वर्षांपासून ३० ते ४० वयोगटातील हृदय विकार वाढते

हृदयरोग तज्ज्ञांचे निरीक्षण

मुंबई: बिग बॉस १३चा (Big Boss-13) विजेता आणि छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे (४०) (Siddharth Shukla) गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

सिद्धार्थचा मृतदेह मुंबईतील पालिकेच्या कूपर हॉस्पिटलमध्ये (Cooper Hospital) शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आला आहे. बुधवारी रात्री झोपण्यापूर्वी सिद्धार्थने काही औषधे घेतली होती. सकाळी तो न उठल्याने मुंबईच्या कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्यापूर्वीच सकाळी ९:२५ वाजता सिद्धार्थचा हृदय विकाराच्या झटक्याने (Cardiac attack) मृत्यू झाल्याचे समोर आले. त्याने कोणते औषध घेतले होते हे स्पष्ट झालेले नाही. सिद्धार्थचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान सिद्धार्थ शुक्ला याचे वयाच्या ४० व्या वर्षी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. ह्रदय विकाराच्या झटक्यामुळे तरुणांमधील ह्रदय विकाराचे प्रमाण दुपटीने वाढले असल्याचे ह्रदय विकार तज्ज्ञ सांगत आहेत.

बदललेल्या जीवनशैलीतून ३० ते ४० वयोगटातील अनेक तरुणांना हृदय विकार जडत आहे. वेळीच लक्षात येऊन उपचार घेतले तर त्यावर मात करता येते असेही तज्ज्ञ सांगतात.

यावर बोलताना पालिकेच्या केईएम रुग्णालयातील माजी विभागप्रमुख हृदय विकार तज्ज्ञ डाॅ. प्रफुल्ल केरकर यांनी सांगितले की, गेल्या १० ते १५ वर्षांच्या कालावधीत ३० ते ४० वयोगटात हृदय विकार जडण्याचे प्रमाण वाढले आहे. भारतीयांमध्ये पाश्चिमात्य देशातील नागरिकांपेक्षा हृदय झटका येण्याचा कालावधी हा १० वर्षांआधीचा आहे. कारण तरुणाईत धूम्रपानाचे प्रमाण वाढले असून व्यायामाचा अभाव दिसून येतो.

तसेच सध्या प्रत्येकाची जीवनशैली बदललेली आहे. सकस आहाराची कमतरता दिसते. यातून ही हृदयावर ताण पडत असल्याचे डॉ. केरकर यांनी स्पष्ट केले.

तसेच ४० वयोगटाखालील तरुण तरुणी अंमली पदार्थांचे सेवन करताना दिसून येतात. जे तरुण तरुणी अंमली पदार्थ घेतात, धूम्रपान करतात किंवा दिवसभर खूप प्रमाणात कॉफीचे सेवन करतात, त्यांच्यात हृदयाचे ठोके सामान्यापेक्षा जास्त दिसून येत असल्याचे कोरोना काळात दिसून आले. तर त्यांचा पल्स रेट १०० च्या वर दिसून येत असल्याचे डाॅ. केरकर म्हणाले.

हृदय विकार टाळण्यासाठी नियमित किमान ३० मिनिटे व्यायाम करावा, पौष्टिक आहारचे सेवन करावेत, जंकफुडचं सेवन करणे शक्यतो टाळावेत, हृदयाचे कार्य व्यवस्थित सुरू आहे की हे तपासून पाहण्यासाठी ईसीजी, हृदयाची सोनोग्राफी या चाचण्या सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे चाळीशीनंतर प्रत्येकाने वेळोवेळी ही चाचणी करू घेणं आवश्यक असल्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here