@maharashtracity

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा ठरली फलदायी

मुंबई: गेले चार दिवसांपासून सुरु असलेले राज्यातील निवासी डॉक्टरांचे काम बंद आंदोलन अखेर आज मागे घेण्यात आले असल्याचे निवासी डॉक्टरांच्या मध्यवर्ती मार्ड संघटनेने घोषित केले. (Resident doctors suspended strike)

सोमवारी दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या निवासस्थानी मार्ड संघटनांच्या प्रतिनिधींशी केलेली चर्चा फलदायी ठरली. या चर्चेत निवासी डॉक्टरांच्या समस्यांचे मुद्दे उपस्थित करण्यात आले.

या प्रत्येकावर समाधानकारक उकल मिळाली असल्याने मार्ड संघटनेने संप मागे घेतला असल्याचे सांगत मंगळवारपासून डॉक्टर रुग्णसेवेत रुजू होणार आहेत. तसेच मागण्यांची पूर्तता एका महिन्यात करण्यात येईल, अशी ग्वाही सरकारकडून देण्यात आली.

या बैठकीला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, वित्त व वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव डॉ. दिलीप म्हैसेकर, मध्यवर्ती मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर ढोबळे पाटील, शिवाय राज्यातील पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते.

Also Read: राज्यातील निवासी डाॅक्टरांच्या संपाचा दुसरा दिवस

यात निवासी डॉक्टर यांच्या सर्व मागण्यावर साकारात्मक चर्चा झाली व एका महिन्यात पूर्तता करण्यात येईल अशी ग्वाही देण्यात आली.

दरम्यान, यात राज्यातील सर्व सरकारी व महानगर पालिका वैद्यकीय महावियालयातील निवासी डॉक्टर यांना त्यांच्या कार्याचा सन्मान आणि ऋणानुबंध व्यक्त करण्यासाठी सन्मान निधी देण्यात येणार आहे.

काम बंद आंदोलनाच्या केंद्रस्थानी असलेली मागणी म्हणजे शैक्षणिक शुल्क माफी हि तांत्रिक बाबीमुळे अशक्य असल्याने त्या क्षेत्रातील तज्ज्ञ लोकांसोबत चर्चा करून यावर निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

तर पालिका वैद्यकीय महाविद्यालयातील टीडीएसबद्दल तज्ज्ञ चार्टर्ड अकाउंट यांच्याकडून मत घेऊन शक्य तो सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे सांगण्यात आले. सर्व सरकारी व महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी वसतिगृहामध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्यात येतील. असा तोडगा काढण्यात आल्याने मार्ड संघटनेने काम बंद आंदोलन मागे घेतले असल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here