@maharashtracity

वर्षभरात 32 हजाराहून अधिक लोकांना मिळवून दिला योजनांचा लाभ

धुळे: आत्मनिर्भर मार्गदर्शन केंद्राच्या (Atmanirbhar Guidance Center) माध्यमातून गेल्या एका वर्षात 32 हजार 500 हून अधिक युवकांसह शेतकरी आणि महिलांना या योजनेचा लाभ मिळवून दिला आहे. तसेच आत्मनिर्भर केंद्राच्या माध्यमातूनच 30 हजारहून अधिक ई-श्रम कार्ड श्रमिकांना (e-shramik card) काढून देण्यात आले आहे. या योजनेतून अनेकजण आत्मनिर्भर बनत असल्याने लवकरच देशातील नऊ राज्यातील 25 शहरांमध्ये महाराष्ट्राच्या धर्तीवर भाजयुमोतर्फे (BJYM) आत्मनिर्भर केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहीती आत्मनिर्भर मार्गदर्शन केंद्र उपक्रमाचे प्रदेश संयोजक तथा भाजयूमोचे प्रदेश सचिव हर्षल विभांडीक यांनी दिली.

केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून युवा, शेतकरी (farmers) आणि महिला (women) अशा समाजातील विविध घटकांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा (Bharatiya Janata Yuva Morcha) आणि आत्मनिर्भर मार्गदर्शन केंद्राचे पदाधिकारी व संयोजक अथक परिश्रम घेत आहे.

मुंबईत भाजयूमो महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी बैठकीत आत्मनिर्भर मार्गदर्शन केंद्र उपक्रमाचे प्रदेश संयोजक आणि भाजयुमो प्रदेश सचिव हर्षल विभांडीक यांच्या नेतृत्वात राज्यभर भाजयुमो तर्फे राबविल्या जात असलेल्या आत्मनिर्भर मार्गदर्शन केंद्र उपक्रमाचा प्रथम वार्षिक अहवाल माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजयुमो प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्याकडे सादर करण्यात आला.

उपस्थितांच्या हस्ते वार्षिक अहवाल प्रकाशित झाला असून महाराष्ट्रातील आत्मनिर्भर मार्गदर्शन केंद्र उपक्रमाची भाजयुमोचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सुर्या यांनीही दखल घेतली आहे. या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित प्रदेश महामंत्री सुशिल मेंगडे, शिवानी दाणी, राहुल लोणीकर आणि आत्मनिर्भर विभाग संयोजक हर्षवर्धन कराड, संकेत खरपुडे, विजय बनछोडे, विनय सावंत, सारंग कदम, ललिता जाधव आदी उपस्थित होते.

प्रदेश संयाजेक हर्षल विभांडीक यांच्या नेतृत्वात भाजयुमोतर्फे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये 327 आत्मनिर्भर संयोजक कार्यरत आहेत. केंद्र सरकारच्या विविध योजनांचा युवा, शेतकरी आणि महिला अशा समाजातील विविध घटकांना लाभ मिळवून दिला जात असून मागील एक वर्षात 32 हजार 500 हून अधिक लोकांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.

तसेच राज्यभरात 32 फार्मर प्रोड्युसर कंपन्या (Farmers Producer company) आणि 300 हून अधिक महिला बचत गटांना (Women Self Help Group) केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आत्मनिर्भर केंद्र कार्यरत आहेत, अशी माहिती विभांडींक यांनी दिली.

शेतकर्‍यांना प्रोत्साहनासाठी पंंतप्रधानांचे 12 लाखांचे अनुदान

1 जानेवारी 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी किसान सन्मान उपक्रमांतर्गत भाजयुमो महाराष्ट्रतर्फे नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील जननशांती फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या शेतकर्‍यांशी संवाद साधला आणि त्यांना 12 लाख रुपयांचे भागभांडवलाचे अनुदान सुपूर्द केले.

या कंपनीच्या माध्यमातून शेतकर्‍यांनी प्रत्येकी दोन हजार देऊन 12 लाखांचे भांडवल उभे केल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुध्दा पुढाकार घेत शेतकर्‍यांना प्रोत्साहन मिळावे याकरीता विना परताव्याचे 12 लाखांचे अनुदान दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here