मुंबई: प्रतिनिधी मुस्लिम महिलांचे आक्षेपार्ह छायाचित्र समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करून आक्षेपार्ह मजकूर टाकल्या प्रकरणी ६ जणांना अटक केली असल्याची माहिती गृह मंत्री दिलीप वळसे – पाटील यांनी विधान परिषदेत लेखी उत्तरात दिली आहे. हे सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत असल्याचे सांगण्यात आले.

या प्रकरणात एका मुस्लिम महिलेचा फोटो समाज माध्यमावर अपलोड करून त्याचा लिलाव करण्याचा प्रकार उघडकीस आला. यात अटक झालेल्या आरोपींची चौकशी करून काय कारवाई करण्यात आली, असा सवाल शिवेसेनेच्या सदस्य प्रा डॉ मनीषा कायंदे यांनी
विचारला होता.

कारवाईसाठी उशीर होत असल्यास त्याचे कारणही यावेळी विचारण्यात आले. या प्रश्नाला लेखी उत्तर देताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले कि, या प्रकरणी बीकेसी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून या गुन्ह्यात ६ जणांना अटक करण्यात आली आहे. हे सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत असून पोलीस गुन्ह्याचा तपास करत असल्याचे वळसे पाटील यांनी नमूद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here