राज्यात ९,५५८ नवीन रुग्ण
मुंबईत एक अंकी मृत्यू नोंद

@maharashtracity

मुंबई: राज्यात मंगळवारी ८,४१८ कोरोना रूग्ण नोंद करण्यात आली होती. तर बुधवारी राज्यात ९,५५८ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यात १ हजाराने रुग्णवाढ झाल्याचे दिसून आली. गेले दोन दिवस सतत रूग्ण वाढ होत असल्याचे नोंद होत आहे.

आता राज्यातील करोना (corona) बाधित रुग्णांची एकूण संख्या ६१,२२,८९३ झाली आहे. आज ८,८९९ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ५८,८१,१६७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.०५ % एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण १,१४,६२५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान राज्यात बुधवारी १४७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. नोंद झालेल्या एकूण १४७ मृत्यूंपैकी ९८ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ४९ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.

एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने राज्यातील एकूण मृत्यूची संख्या १७९ ने वाढली आहे.

हे १७९ मृत्यू, पुणे-६१, पालघर-२८, सांगली-१९, लातूर-१३, ठाणे-११, सातारा-९, नाशिक-७, अहमदनगर-५, औरंगाबाद-५, बुलढाणा-४, कोल्हापूर-३, सोलापूर-३, बीड-२, हिंगोली-२, रत्नागिरी-२, अकोला-१, अमरावती-१, जळगाव-१, नागपूर-१ आणि सिंधुदुर्ग-१ असे आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०२ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,३१,२४,८०० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६१,२२,८९३ (१४.२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

सध्या राज्यात ६,३४,४२३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,६४५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबईत आज एक अंकी मृत्यू नोंद

मुंबईत (Mumbai) दिवसभरात ९ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आता पर्यंत १५५७३ मृत्यूची नोंद करण्यात आली. तर ६६२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. आता पर्यंत बाधित रुग्णांची संख्या ७२६२७८ एवढी झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here