@maharashtracity

राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 66 लाखावर

मुंबईत दिवसभरात ५४२८ बाधित

ओमिक्राॅन रुग्णांची संख्या हि चार पटीने वाढली

मुंबई: राज्यात शुक्रवारी ८,॰६७ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. सरत्या वर्षाच्या दिवसात आगामी वर्षात महामारीने काय वाढून ठेवले आहे याची कल्पना या आकडेवारीवरून येत आहे. आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची (corona patients) एकूण संख्या ६६,७८,८२१ एवढी झाली आहे. तर शुक्रवारी निव्वळ १,७६६ रुग्ण बरे होऊन घरी गेले असल्याचे सांगण्यात आले.

आता राज्यात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ६५,०९,०९६ एवढी झाली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.४६ टक्के एवढे झाले आहे. तर राज्यात शुक्रवारी ८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृत्यू दर २.११ टक्के एवढा झाला आहे.

दरम्यान, राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,९०,१०,१५३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,७८,८२१ (९.६८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले असून सध्या राज्यात १,७५,५९२ जण होमक्वारंटाईन (Home Quarantine) आहेत. तर १०७९ जण संस्थात्मक क्वारंटाईन (Institutional Quarantine) आहेत. राज्यात आज रोजी एकूण २४,५०९ सक्रिय रुग्ण असल्याचे सांगण्यात आले.

तसेच मुंबई महानगर पालिका (BMC) क्षेत्रात शुक्रवारी दिवसभरात तब्बल ५४२८ रुग्ण आढळले. आता मुंबईतील कोरोना बाधितांची संख्या ७८४४५९ एवढी झाली. तर दिवसभरात एकाचा मृत्यू झाला असून मुंबईत आजपर्यंत एकूण १६३७६ मृत्यू झाले असल्याचे सांगण्यात आले.

राज्यात शुक्रवारी ४ ओमिक्रोन रुग्ण :

राज्यात शुक्रवारी ४ ओमिक्रोनबाधित रुग्ण (Omicron patient) आढळले. हे सर्व रुग्ण राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने म्हणजेच (National Institute of Virology – NIV) कडून रिपोर्ट केले आहेत. तर वसई विरार, नवी मुंबई, मीरा भाईंदर आणि पनवेल येथील प्रत्येकी १ रुग्ण बाधित आढळला आहे.

आता राज्यातील ओमिक्रोन संख्या एकूण ४५४ झाली असल्याचे सांगण्यात आले. यानुसार मुंबई ३२७, पिंपरी चिंचवड २६, पुणे ग्रामीण १८, पुणे मनपा आणि ठाणे मनपा १२, नवी मुंबई, पनवेल प्रत्येकी ८, कल्याण डोंबिवली ७, नागपूर आणि सातारा प्रत्येकी ६, उस्मानाबाद ५, वसई विरार ४, नांदेड ३, ११ औरंगाबाद, बुलढाणा, भिवंडी निजामपूर मनपा, मीरा भाईंदर प्रत्येकी २, १२ लातूर, अहमदनगर, अकोला, कोल्हापूर प्रत्येकी १ असे मिळून एकूण ४५४ ओमिक्राॅन रुग्ण राज्यात आहेत.

मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) आढळलेले २६ रुग्ण हे इतर राज्यातील असून प्रत्येकी १ रुग्ण पालघर, जळगाव, नवी मुंबई, नाशिक, रायगड आणि औरंगाबाद येथील आहे. ७ रुग्ण ठाणे आणि ४ रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. तर ९ रुग्ण विदेशी नागरिक असल्याचे सांगण्यात आले.

यापैकी १५७ रुग्णांना त्यांची आर टी पी सी आर चाचणी (RTPCR Test) निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, राज्यात १ नोव्हेंबरपासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रीय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत १७१० प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी (Genome Sequencing) पाठविण्यात आले आहेत. यापैकी १३९ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here