राज्यात ८,७५३ तर मुंबईत दिवसभरात ६७३ नवे बाधित

@maharashtracity

मुंबई: राज्यात शुक्रवारी ८,७५३ नवीन रुग्णांची नोंद झाल्याने गुरुवारच्या तुलनेत किंचित घटल्याचे समोर आले. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६०,७९,३५२ झाली आहे. काल ८,३८५ रुग्ण बरे होऊन घरी गेले.

राज्यात आजपर्यंत एकूण ५८,३६,९२० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.०१ % एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण १,१६,८६७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान राज्यात शुक्रवारी १५६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. नोंद झालेल्या एकूण १५६ मृत्यूंपैकी १२९ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २७ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०१ % एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,२०,९६,५०६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६०,७९,३५२ (१४.४४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६,२४,७४५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,४७२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबईत दिवसभरात ६७३

मुंबईत दिवसभरात ६७३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. आता पर्यंत बाधित रुग्णांची संख्या ७२३५५१ एवढी झाली आहे. तर २७ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आता पर्यंत १५४९९ मृत्यूची नोंद करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here