@maharashtracity

राज्यात ६,४३६ नवीन रुग्ण

मुंबई: गेल्या चार दिवसापासून राज्यातील कोरोना नोंदीत रोज २ ते ३ हजारांची घट दिसून येत आहे. सोमवारी ६,४३६ नवीन कोरोना रुग्णांची (corona patients) नोंद झाली. तर गुरुवारी १५,२५२, शुक्रवारी १३,८४०, शनिवारी ११,३९४ तर रविवारी ९,६६६ कोरोना नोंद करण्यात आली होती. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७८,१०,१३६ झाली आहे.

सोमवारी १८,४२३ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ७५,५७,०३४ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.७६ % एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण १,०६,०५९ ॲक्टिव्ह रुग्ण असल्याचे सांगण्यात आले.

तसेच राज्यात सोमवारी २४ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८३ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,५६,५५,०१२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,१०,१३६ (१०.३२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
सध्या राज्यात ६,७३,८७५ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर २,३८३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबईत ३५६ बाधित

मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्रात ३५६ एवढे रूग्ण आढळले. आता मुंबईत एकूण १०,५०,८११ रुग्ण आढळले. तसेच ५ रुग्णांचा मृत्यू झाल्याने मुंबईतील एकूण मृत्यूची संख्या १६,६६६ एवढी झाली आहे.

राज्यात ३३३४ ओमिक्रॉन बाधित

आजपर्यंत राज्यात एकूण ३३३४ ओमायक्रॉन विषाणू (Omicron patients) बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. यापैकी २०२३ रुग्णांना त्यांची आर टी पी सी आर चाचणी (RTPCR test) निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत एकूण ७०१४ नमुने जनुकीय तपासणीसाठी (genome sequencing) पाठवण्यात आले असून त्यांपैकी ६९०१ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले आहेत आणि ११३ नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here