@maharashtracity

पालिकेकडून चौकशी समिती गठीत

मुंबई: भांडुप येथील सावित्रीबाई फुले प्रसूतिगृहातील लहान बालकांच्या मृत्यू प्रकरणी पालिका प्रशासनाने वैद्यकीय तज्ज्ञांची एक चौकशी समिती गठीत केली असून ही समिती पुढील ७ दिवसात आपला चौकशी अहवाल प्रशासनाला सादर करणार आहे.

या चौकशी समितीमध्ये, सायन रुग्णालयातील (Sion Hospital) नवजात शिशु अति दक्षता विभागाचे प्रमुख, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ आणि बालरोग तज्ज्ञ यांचा समावेश आहे.

सावित्रीबाई फुले प्रसूतिगृहातील अतिदक्षता विभागात (ICU) शॉर्टसर्किट होऊन जंतूसंसर्गामुळे (Septic infection) चार बालकांचा चार दिवसात दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणाला भाजप नगरसेवकांनी आज वाचा फोडल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे.

सुदैवाने, या प्रसूतिगृहातील व्हेंटिलेटरवरील (Ventilator) दोन बालकांची प्रकृती आता ठीक आहे. मात्र एका बालकाची प्रकृती गंभीर असल्याचे सूत्रांकडून समजते.

Also Read: जीएसटीपोटी पालिका तिजोरीत ४० हजार कोटीं रुपये जमा

पालिकेच्या सावित्रीबाई फुले प्रसूतिगृहातील अतिदक्षता विभाग खासगी वैद्यकीय संस्थेला भाडे तत्वावर चालवायला देण्यात आला आहे. याठिकाणी २० खाटा असून १० खाटा प्रसूतिगृहात जन्मलेल्या बालकांसाठी तर उर्वरित १० खाटा प्रसूतिगृहाबाहेर जन्मलेल्या मात्र प्रकृती गंभीर असलेल्या बालकांसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.

सध्या या प्रसूतिगृहात १५ बालक दाखल आहेत. १४ ते १६ डिसेंबर या कालावधीत येथील अति दक्षता विभागात एक मुलगी तर ६ मुले अशी ७ नवजात बालके दाखल झाली होती. मात्र त्यापैकी एका बालकाला अतिसाराचा त्रास झाल्याने त्याच्यावर उपचार सुरू होते.

तसेच, एका बालकाचे वजन कमी असून आणखीन एक बालक पूर्णवाढ न झालेले आहे. त्याचप्रमाणे, एका बालकाची प्रकृती मात्र गंभीर असल्याचे समजते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here