@maharashtracity

मुंबई: बीडीडी येथे झालेल्या सिलेंडर स्फोट (cylinder blast incident) घटनास्थळी मुंबईच्या महापौर वेळेत पोहचल्या नसल्याने एका राजकीय नेत्याने आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी चार्जशीट दाखल केला का असा सवाल उपस्थित केल्यावर विधान परिषदेत (Vidhan Parishad) गदारोळ उठला.

यावेळी दोन्ही बाकांना शांत होण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र प्रचंड घोषणाबाजीमुळे सभागृह १० मिनिटासाठी तहकूब करावे लागले. दरम्यान, लक्षवेधी सुरु होण्याआधी सभापती रामराजे निंबाळकर (Ramraje Nimbalkar) यांनी आधीच सूचना केली होती की काही लक्षवेधी न्यायप्रविष्ट असून योग्य पद्धतीने मांडण्यात याव्यात. तरीही न्यायप्रविष्ट विषयावरून गोंधळ झालाच.

आमदार डॉ. मनीषा कायंदे (Manisha Kayande), विलास पोतनीस, रवींद्र फाटक, अंबादास दानवे (Ambadas Danve) या सदस्यांनी यावर प्रश्न उपस्थित केला. ‘त्या’ राजकीय नेत्याने पत्रकार परिषदेत महापौरांबाबत समस्त महिला वर्गाचा अपमान होणारे वक्तव्य केले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल करून गृहमंत्र्यांकडे तक्रार करणे, तसेच पोलीस आयुक्तांकडे तक्रार करून संबंधित व्यक्तीस अटक करण्याची मागणी केली.

तसेच महापौरांना विकृत पत्र पाठवून धमकी देण्यात आली. मात्र या धमकी देणाऱ्याचा शोध न लागणे यावर कारवाई होण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले. मात्र यावर विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी हेमा मालिनी (Hema Malini) यांच्या गालाची उपमा देणाऱ्या नेत्याच्या वक्तव्याची आठवण करून दिली.

या नंतर घोषणाबाजी सुरु झाली. दोन्ही बाजूने घोषणा सुरु झाल्यावर प्रचंड गदारोळ सुरु झाला. दरम्यान ते नेमकं वक्तव्य काय ते समजून घेण्याचे काम सुरु आहे. चार्जशीट दाखल करून घेण्यात येणार असल्याचे उत्तर गृहराज्यमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी दिले. दरम्यान हा न थांबणारा गोंधळ पाहून सभापतींनी सभागृह दहा मिनिटासाठी तहकूब केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here