@maharashtracity

धुळे: धुळे व नंदुरबार जिल्हा सहकारी बँकेच्या शेतकरी सभासदांनी कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही गेल्या वर्षी स्वच्छेने ९६ टक्क्यांपर्यंत कर्जाची परतफेड केली. (96 percent Farmers repaid bank loans despite corona pandemic) त्याबद्दल शेतकरी सभासदांचे जाहिर अभिनंदन करीत पात्र शेतकरी सभासदांना पुढील वर्षी दहा एप्रिलपासून नवीन वाढीव दराने पीककर्ज वाटप होणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे (Rajwardhan Kadambande) यांनी दिली.

जिल्हा बँकेची ६४ वी वार्षिक सर्वसाधाण सभा बुधवारी कोविडच्या पार्श्वभूमीवर प्रथमच ऑनलाईन प्रणालीद्वारे घेण्यात आली. सभेला धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील दहा तालुक्यातील सभासद ऑनलाईन पध्दतीने सहभागी झाले होते.

कोविडची स्थिती असतानाही बँकेची ९६ टक्के कर्जवसुली झाली. तसेच संस्थेकडून ६३९ कर्जदार वि.का.सोसायटींना कर्जपुरवठा केल्याची माहिती देण्यात आली. तर ३१ ऑगस्ट २०२१ अखे २५९.२९ कोटीचे किसान क्रेडीट कर्ज व मायक्रो एटीएम मार्फत संपूर्ण कर्ज वाटप करण्यात आले आहे.

Also Read: हेलिकॉप्टर, बोटींनी सुमारे शंभर जणांना वाचवले

बँकेचे धुळे जिल्ह्यात ४०५ व नंदुरबार जिल्ह्यात २३४ अशा एकूण ६३९ वि.का.संस्थांना कर्ज वाटप केले आहे. पाच लाखापर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण दिले गेले आहे.

बँकेच्या धुळे येथील मुख्य शाखेत ३६५ दिवस २४ बाय ७ अशी सुविधा सुरू करण्यात आली आहे. तसेच भारत बिल पेमेंट सव्हीस देण्याचे काम सुरू आहे. क्युआर कोड देणेचे प्रगतीपथावर आहे. तर बचत गटांना सहा लाखापर्यंत कर्ज पुरवठा केला जातो. सर्व शाखेतून शेतकर्‍यांना संगणकावर ७/१२, ६ ब, ८ अ खाते उतारा देण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच केवायसीचे पूर्तता करणे आदीबाबत काम करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here