@maharashtracity

धुळे: जिल्हाधिकार्‍यांचा जमावबंदीचा आदेश लागू असताना रस्ता अडवून सभा घेतल्याने एमआयएमचे विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष नजर खान यांच्यासह पदाधिकार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. (police case registered against MIM party workers)

जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सण-उत्सवांच्या पार्श्‍वभूमीवर शहरासह जिल्ह्यात जमावबंदीचा आदेश जारी केला आहे. कोविड महामारीच्या अनुषंगाने गर्दी टाळण्यासाठी हे आदेश लागू केले आहेत. (Violation of section 144)

हे आदेश लागू असताना एमआयएम विद्यार्थी आघाडीचे धुळे शहराध्यक्ष नजर खान व पदाधिकार्‍यांनी 17 ऑक्टोबरला सायंकाळी सात ते रात्री दहा या वेळेत देवपूरमधील नूर नगरमध्ये रस्ता अडवून जाहीर सभा घेतली.

सभेसाठी गर्दी जमल्याने जमावबंदी आदेशाचे उल्लंघन झाल्याने देवपूर पोलिस ठाण्याचे हवालदार प्रकाश थोरात यांच्या फिर्यादीवरून नजर खान यांच्यासह पदाधिकारी खालिद अन्सारी, हमीद अन्सारी, समीर खान, सलीम दादा, गजर भाई व अन्य संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here