नवी दिल्ली

फ्लिपकार्टने Big Year End Sale ची घोषणा आपल्या प्लॅटफॉर्मवरुन (Flipkart’s Big Year End Sale) केली आहे. हा सेल उद्या 9 डिसेंबर ते 16 डिसेंबरपर्यंत सुरू राहील. या सेलमध्ये स्मार्टफोन आणि इतर अनेक इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्टवर आकर्षक ऑफर मिळत आहेत.

फ्लिपकार्टच्या सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर एक्सेसरीजवर 50 ते 80 टक्क्यांपर्यंत सवलत मिळत आहे. तुम्ही स्मार्टफोन सवलतीत खरेदी करू शकता. याशिवाय हेडफोन, लॅपटॉप, स्पीकर आणि दुसऱ्या वस्तूंवरही सवलत मिळत आहे. जाणून घ्या या सवलतींविषय…

कोणत्या फोनवर मिळतेय ऑफर?
नवा फोन खरेदी करण्याचा प्लान करीत असाल तर ही सवलत तुमच्यासाठी फायदेशीर आहे. सवलतीत गुगल पिक्सेल 7 सीरिज आणि पिक्सेल 8 वर चांगली सवलत मिळत आहे. याशिवाय सॅमसंग गॅलेक्सी एस 21 एफई सवलतीनंतर 31,999 रुपयांत खरेदी करू शकता. आयफोन 14 तुम्ही 54,999 रुपयांत खरेदी करू शकता. तर सॅमसंग गॅलेक्सी एस22 5जी वरील सवलतीनंतर 37,999 रुपयात खरेदी करू शकता. तर गुगल पिक्सल 7 तुम्ही अवघ्या 35,999 रुपयात खरेगी करू शकता.

टीव्ही आणि लॅपटॉपवरही मिळतेय सवलत
तुम्ही विविध प्रकारच्या ब्रँडचे टीव्ही आणि लॅपटॉप सवलतीत खरेदी करू शकता. यात एसर वन14 हा लॅपटॉप 36,990, लेनेवो आयडिया पॅन फ्लेक्स 65,990, एचपी 255 जी9 840टी7पीएस अवघ्या 19,990 रुपयात खरेदी करू शकता. याशिवाय 10 हजारांहून कमी किमतीत टीव्हीची खरेदी करू शकता. यात थॉपसनचा टीव्ही अवघ्या 5999 रुपयात मिळतोय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here