@maharashtracity

कोरोनाच्या विषाणूचे बदलते स्वरूप समजणार
पहिल्या टप्प्यात १९६ सॅम्पलची चाचणी

मुंबई: मुंबईत (Mumbai) कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या कोरोनाच्या (corona) विषाणूचे बदलते स्वरूप अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने (BMC) या कोरोनाच्या विषाणूचे स्वरूप ओळखण्यासाठी व त्यानुसार उपचार करण्यासाठी कस्तुरबा रुग्णालयात (Kasturba Hospital) ‘जिनोम सिक्वेंसिंग’ (Genome Sequencing) मशीन आयात केले आहे. आता कोरोनाच्या १९६ चाचण्यांचा अहवाल फक्त दोन दिवसांत उपलब्ध होणार आहे. या चाचण्यांना सुरुवात झाली आहे. ही बाब मुंबईकरांसाठी दिलासादायक ठरणार आहे.

मुंबईत गेल्या मार्च २०२० पासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. पालिकेने विविध उपाययोजना करून कोरोनाच्या पहिल्या लाटेवर जानेवारी २०२१च्या सुमारास नियंत्रण मिळवले. मात्र काही नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे कोरोनाग्रस्तांची संख्या अचानक वाढत गेली व दुसरी लाट फेब्रुवारी २०२१ ला धडकली. आता कोरोनाची तिसरी लाट लवकरच येणार आहे. त्या दृष्टीने मुंबई महापालिका काळजी घेत असून विविध उपाययोजना करीत आहे.

मात्र, कोरोनाचा विषाणू सतत आपले रूप बदलत आहे. त्यामुळे पालिका आरोग्य यंत्रणेला काही प्रमाणात अडचणी येत आहेत. कोरोनाचा म्युकरमाकोसिस (Mucormycosis) डेल्टा आणि डेल्टा प्लससारख्या (Delta Plus) कोरोनाच्या विषाणूचे स्वरूप ओळखणाऱ्या ‘जिनोम सिक्वेंसिंग’ चाचण्या पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात सुरू झाल्या आहेत. पहिल्या टप्प्यात १९६ सॅम्पल टेस्टिंग मशीनमध्ये ठेवण्यात आले आहेत. दोन दिवसांत त्यांचा अहवाल मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here