@maharashtracity

धुळे: जिल्ह्यासह धुळे (Dhule) शहरात आज सलग चौथ्या दिवशी पावसाची रिपरिप सुरूच आहे. जिल्ह्यात आज शुक्रवारी सकाळी ८ वाजेपर्यंत ११.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तीन दिवसांत धुळे शहरात ९५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

येत्या चोवीस तासांत अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला असला तरी धुळ्यात मुसळधार पाऊस झालेला नाही.

धुळे जिल्ह्यात होत असलेल्या संततधार पावसामुळे साक्री (Sakri) तालुक्यातील पांझरा प्रकल्पात (Panzara irrigation project) पाणीसाठा काही प्रमाणात वाढून ५९.६१ टक्के जलसाठा झाला आहे. तसेच तापी नदीवरील (Tapti river) हतनुर धरणाचे (Hatnur dam) सर्व दरवाजे आज सकाळी ७ वाजता उघडण्यात आल्याने तापी नदी पात्रात ४० हजार क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे धुळे जिल्ह्यातील शिरपूर, शिंदखेडा तालुक्यातील तापी नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here