@maharashtracity

राज्यपालांच्या कुलगुरुंना सूचना

भाजयूमोची माहीती

धुळे: धुळे शहरात पिक संशोधन केंद्र (crop research centre) व कृषी पर्यटन केंद्रासाठी राज्यपालांनी राज्य शासन व कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंना कार्यवाही करून निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासाठी भाजपा युवा मोर्चाचा सतत पाठपुरवा सुरू होता.

भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील व भाजपा जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्या उपस्थितीत दि. 29 ऑक्टोंबर 2021 रोजी भाजयुमोतर्फे (Bharatiya Janata Yuva Morcha) राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेण्यात आली होती. या भेटीत महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विभाजन (Mahatma Phule Agriculture University) होऊन नवीन विद्यापीठ धुळे जिल्ह्यात व्हावे व विविध पिकांचे संशोधन केंद्र धुळे येथे सुरू करावे. तसेच शासकीय कृषी पर्यटन केंद्र धुळे येथे सुरू व्हावे, अशी सकारात्मक चर्चा झाली होती.

त्यावर राज्यपालांनी (Governor Bhagat Singh Koshyari) उत्तर देत संबंधित राज्य शासन व कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंना (Vice Chancellor) योग्य ती कार्यवाही करून निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे कृषी पर्यटन (Agro tourism) सुरू होऊन धुळ्यातील शेतकरी विद्यार्थी व युवकांना याचा फायदा होणार आहे.

राज्यपालांच्या पत्रानुसार कार्यवाही अंमलात आणल्यावर कृषी उत्पादन वाढीसाठी व नवनवीन प्रयोगांसाठी फायदेशीर असे तंत्रज्ञान शेतकर्‍यांना अवगत होईल. कृषी पर्यटन व त्यासंबंधी पूरक लघुउद्योग (allied agro business) वाढल्याने धुळ्यात रोजगार वाढीस लागेल व वाढत्या बेरोजगारीचा बिकट प्रश्‍न सुटण्यास मदत मिळेल.

नजीकच्या काळात जिल्ह्यात कृषी विद्यापीठ होण्यास चालना मिळले. तसेच शहर मेट्रो सिटी (metro city) बनण्याकडे पहिले पाऊल टाकण्यास व धुळे हा सक्षम जिल्हा म्हणून नावारूपास येईल, असे भाजयुमोचे (BJYM) जिल्हाध्यक्ष अ‍ॅड रोहित चांदोडे यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here