@maharashtracity

भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांचा उपक्रम*

मुंबई: देशाने आजअखेर १०० कोटी लसीकरणाचा टप्पा पार केल्याच्या निमित्ताने भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी आपल्या वांद्रे पश्चिम विधानसभा मतदार संघात लसीकरणात भाग घेतेल्या डाँक्टर, नर्स आणि कर्मचारी अशा २२५ जणांचा आज प्रत्यक्ष भेटून सत्कार केला. (BJP MLA Ashish Shelar felicitates nurses and doctors).

देशाने आजअखेर १०० कोटी लसीकरणाचा (1 billion vaccination) टप्पा पार केल्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) लसीकरणात भाग घेतलेल्या कर्मचारी, डाँक्टर व नर्स यांचे आभार मानले आहेत. तेच अवचित्य साधून आमदार अँड आशिष शेलार यांनी वांद्रे पश्चिम विधानसभेतील २२५ जणांना आज पुस्तक, पुष्पगुच्छ व कृतज्ञता प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले.

वांद्रे पश्चिम विधानसभा क्षेत्रात एकुण १० लसीकरण केंद्र सुरू असून एक कोविड वाँररुम अशा ११ केंद्रातील कर्मचा-यांचा सन्मान आज करण्यात आला. यामध्ये महिला संघ सभागृह, सांताक्रूझ, सुर्या हाँस्पिटल, रामकृष्ण मिशन रुग्णालय, जी. ए कुलकर्णी हायस्कुल, हार्मोनी लसीकरण केंद्र, बांद्रा भाभा रुग्णालय, जुना महापालिका दवाखाना वांद्रे, होली फँमिली रुग्णालय, रंगशारदा लसीकरण केंद्र आणि लिलावती रुग्णालयासह सुमारे २२५ कर्मचाऱ्यांना आज सकाळ पासून प्रत्यक्ष भेटून आमदार आशिष शेलार (BJP MLA Ashish Shelar) यांनी सन्मानित केले.

यावेळी बस्थानिक नगरसेविका अलका केरकर, स्वप्ना म्हात्रे, हेतल गाला यांच्यासह भाजपा विधानसभा अध्यक्ष किशोर पुनवत आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here