@maharashtracity

टाटा मेमोरियल हॉस्पिटल तज्ज्ञांकडून प्रयत्न

मुंबई: टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या डॉक्टरांकडून इमेज गाईडेड इंटेंसिव्ह मॉड्युलेटेड रेडिओथेरपी म्हणजे आयजी-आयएमआरटी तंत्रज्ञानाचा वापर करत गर्भाशयाच्या कर्करोगाने ग्रस्त स्त्रियांच्या वेदनेची तीव्रता जवळपास कमी केली आहे.

ऑपरेशननंतर, सुमारे 20 टक्के स्त्रियांना रेडिएशन थेरपीची (Radiation therapy) आवश्यकता असते, मात्र, स्त्रियांना जुन्या रेडिएशन थेरपी प्रक्रियेमुळे अनेक प्रकारच्या दुष्परिणामांमधून जावे लागले असल्याने याच वेदना कमी करण्याचा प्रयत्न या थेरपीतून करण्यात आला आहे.

यात टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या (Tata hospital) रेडिओलॉजी विभागाने विशेष अभ्यास केला आहे. यावर बोलताना टाटा रुग्णालयातील रेडिएशन ऑन्कोलॉजिस्टचे प्राध्यापक आणि प्रमुख संशोधक डॉ. सुप्रिया चोप्रा यांनी सांगितले की, दरवर्षी देशातील 90,000 महिला गर्भाशयाच्या कर्करोगाने ग्रस्त होतात. यापैकी 20 हजार ते 30 हजार महिलांना शस्त्रक्रियेनंतर रेडिओथेरपीची आवश्यकता असते.

जेव्हा जुन्या पद्धतीद्वारे रेडिओथेरपी दिली जाते, तेव्हा ती त्या अवयवांव्यतिरिक्त इतर अवयवांवरही परिणाम करते, ज्यामुळे स्त्रियांना बऱ्याच प्रकारच्या शारीरिक समस्यांना बराच काळ सामोरे जावे लागते.

त्यानंतर रेडिओथेरपीसाठी आयजी-आयएमआरटी (Image Guided Intensive Modulated Radio Therapy) (IG – IMRT) तंत्र आले. या तंत्राला येण्यास 10 ते 12 वर्षे लागली. परंतु ती गर्भाशयासाठी वापरली गेली नाही. आता हे तंत्र वापरले. यातून स्त्रियांमध्ये रेडिएशनच्या दुष्परिणामांचे पुरावे कमी झाल्याचे आढळले.

जगातील हा पहिला अभ्यास आहे. म्हणजेच टाटा हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी केलेल्या या अभ्यासानंतर इतर देश रुग्णांवर उपचार करू शकतात आणि गर्भाशयाच्या कर्करोगाने ग्रस्त महिलांचे दुःख कमी करू शकतात.

हा अभ्यास जगप्रसिद्ध ‘जर्नल ऑफ क्लिनिकल ऑन्कोलॉजी’ मध्ये (Journal of Clinical Oncology) (अमेरिकन सोसायटी ऑफ ऑन्कोलॉजी) (American Society of Oncology) प्रकाशित झाला आहे. या अभ्यासात गर्भाशयाचा कर्करोग असलेल्या 300 स्त्रियांचा समावेश केला गेला ज्यांना रेडिओथेरपीची आवश्यकता होती.

आयजी आयएमआरटी तंत्रज्ञानाच्या मदतीने रेडिएशन केवळ कर्करोगग्रस्त भागात पोहोचते आणि त्याचा इतर अवयवांवर कोणताही दुष्परिणाम होत नाही. आम्हाला आढळले की 97 टक्के महिलांना कोणतेही दुष्परिणाम दिसले नाहीत. या तंत्राच्या मदतीने महिला सामान्य जीवन जगू शकत असल्याचे डॉ. सुप्रिया चोप्रा म्हणाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here