@maharashtracity

३०१ कोटींचा खर्च

दहा मजली रुग्णालय, ३२५ बेड

डॉक्टर, कर्मचाऱ्यांसाठी २२ मजली हॉस्टेल

मुंबई: मुंबई महापालिकेचे (BMC) कांदिवली येथील शताब्दी रुग्णालय (भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर) (Shatabdi Hospital of Kandivli) लवकरच कात टाकणार आहे. तब्बल ३०१ कोटी रुपये खर्चून या रुग्णालयात अत्याधुनिक सेवासुविधा उपलब्ध करून या जुन्या रुग्णालयाचे रूपांतर दहा मजली ‘सुपर स्पेशालिटी’ रुग्णालयात केले जाणार आहे.

रुग्णालयातील डॉक्टर, नर्स, कर्मचारी आदींसाठी २२ मजली हॉस्टेलची सुविधाही उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे मोठ्या आजारांसाठी, अपघात झाल्यास शस्त्रक्रियेसाठी आता शहर विभागातील केईएम, सायन, नायर या प्रमुख रुग्णालयात धाव घ्यावी लागणार नाही.

महापालिकेने हे रुग्णालय उभारण्यासाठी निविदा प्रक्रियाही सुरू केली आहे, अशी माहिती पालिकेचे सब इंजिनियर प्रवीण रेकाडगे यांनी सांगितले.

उपलब्ध होणाऱ्या सुविधा

सध्या या जुन्या शताब्दी रुग्णालयात रुग्णांसाठी ४४५ खाटांची व्यवस्था आहे. मात्र, प्रस्तावित दहा मजली रुग्णालयात भविष्यात रुग्णांना, रेडिओथेरपी डे केअर, अँडोस्कॉपी, हेमॅकोलॉजी, प्लास्टिक सर्जरी, युरोलॉजी, क्रोनिक डायलिसिस सेंटर, कॅथलॅब, एमआरआय, सीटीस्कॅन, एक्स-रे, कार्डिओलॉजी, न्युरोलॉजी, सिटीस्कॅन, ३२५ खाटा आदी सुविधा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे पश्चिम उपनगराशिवाय अगदी मिरा रोड, भाईंदर येथील रुग्णसुद्धा या रुग्णालयात उपचार घेऊ शकणार आहेत.

तसेच, पश्चिम उपनगरातील कूपर, भगवती, जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर रुग्णालय, सेव्हन हिल रुग्णालय, केईएम, सायन, नायर ह्या प्रमुख रुग्णाल्यांवरील आणि परिसरातील खासगी रुग्णालयावरील रुग्ण संख्या वाढीचा ताण कमी होण्यास काहीशी मदत होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here