मुंबई
भारतीय महिला टीमने नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडिअममधील सामन्यात इंग्लंडचा 347 धावांनी पराभव करून महिला टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात सर्वात मोठं यश मिळवलं आहे. भारताच्या यशामागे दीप्ती शर्माची मेहतन दिसून आली, तिने एकून 9 विकेट घेतले.
भारताने इंग्लंडला हा सामना जिंकण्यासाठी 479 धावांचं विशाल लक्ष्य दिलं होतं. तर इंग्लंडला केवळ 131 धावा करता आल्या. टेस्टच्या तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सेशनमध्येच भारताने इंग्लंडचे सर्व १० विकेट घेतले आणि जिंकले.