मुंबई

शनिवारचा दिवस न्यायाची देवता शनिदेवाची पूजा केली जाते. शनिदेव प्रसन्न होतात त्यांना त्यांच्या कामात कधीही अडथळे येत नाहीत. कुंडलीत जर शनि शुभ स्थितीत असेल तर कोणतंही काम सहज होते. शनीची अशुभ स्थिती प्रत्येक कामात अडथळा आणते. शनिवारी शनिदेवाची पूजा करणे खूप शुभ मानले जाते परंतु शनिदेवाच्या उपासनेशी संबंधित काही खास नियम आहेत.

लोक सहसा सर्व देवी-देवतांच्या मूर्ती पूजेसाठी घरात ठेवतात, परंतु शनिदेवाची मूर्ती घरात ठेवणे शुभ मानले जात नाही. चला जाणून घेऊया शनिदेवाची मूर्ती का ठेवत नाही देवघरात…

धार्मिक मान्यतेनुसार शनिदेवाची मूर्ती कधीही घरात ठेवू नये. यामागे एक पौराणिक कथा आहे. या कथेनुसार शनिदेवाला शाप होता की तो ज्याच्याकडे पाहील त्याच्यासोबत वाईट घडेल. शनिदेवाची दृष्टी थेट घरातील सदस्यांवर पडू नये, म्हणून त्यांची मूर्ती देवघरात न ठेवण्याचा सल्ला दिला जातो. तुम्ही जरी मंदिरात शनिदेवाची पूजा करत असाल, तर त्यांच्या समोर कधीही थेट उभे राहणार नाही याची विशेष काळजी घ्या. तसेच शनिदेवाच्या डोळ्यात डोकावून पाहू नका.

(वरील माहिती धार्मिक मान्यतेवर आधारित आहे. महाराष्ट्र सिटी याची पुष्ठी करीत नाही)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here