मुंबई

जसजसा हिवाळा जवळ येतो तसतसे आपल्या खाण्याच्या सवयीही बदलतात. उन्हाळ्याच्या तुलनेत हिवाळ्यात आपण आपल्या आहारात अनेक गोष्टींचा समावेश करतो ज्यामुळे शरीर उबदार राहते. परिणामी सर्दी आणि आजारांपासून आपले संरक्षण होते.
हिवाळ्यात थंडीपासून बचाव करण्यासाठी शरीराला उबदार ठेवण्यासाठी काही पदार्थ नियमित खाणे फायदेशीर ठरते. तुम्ही तुमच्या आजीला हिवाळ्यात गूळ आणि तीळ खाण्यास सांगताना ऐकले असेल. हे दोन्ही पदार्थ थंडीच्या दिवसात ऊबदार ठेवतात. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते. हिवाळ्यात तुमच्या आहारात या 5 गोष्टींचा अवश्य समावेश करा.

खजूर –
हिवाळ्यात खजूर खाणं फायदेशीर मानलं जातं. यात विटॅमिन ए आणि बी मुबलक प्रमाणात असतं. यात उष्णता असल्याने थंडीच्या दिवसात फायदा होतो.

गुळ
पोट आणि संपूर्ण शरीरासाठी गुळ अत्यंत लाभकारक आहे. गुळामुळे मेटॉबॉलिजम चांगलं राहतं. पचनक्रियेसाठीही गुळ महत्त्वाचं काम करतं. यात लोह असल्याने एनिमिया सारख्या समस्या कमी होऊ शकतात.

तीळ
तिळाचा गुणधर्म उष्ण असतो. त्यामुळे थंडीत आवर्जुन तीळ किंवा तिळाचे लाडू खाल्ले जातात. यात प्रथिनांचं प्रमाण चांगलं असतं ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. तीळ हाडांसाठीही चांगलं असतं. यातून रोगप्रतिकारशक्ती वाढते.

शेंगदाणे
शेंगदाण्यामध्ये प्रथिनं चांगल्या प्रमाणात असतात ज्यामुळे ऊर्जा मिळते आणि शरीर उबदार राहतं. याशिवाय व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि इतर खनिजे देखील शेंगदाण्यात आढळतात जे सर्दीशी लढण्यास मदत करतात. शेंगदाणे खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते, ज्यामुळे सर्दी-खोकल्यासारख्या आजारांपासून आपले संरक्षण होते. त्यामुळे हिवाळ्यात शेंगदाणे शरीरासाठी खूप फायदेशीर असते.

बदाम
थंडीत बदाम खाण्याचे खूप फायदे आहेत. यात प्रथिनं, हेल्दी फॅट, आणि अनेक प्रकारचे पोषणमूल्य असतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here