@maharashtracity

पुन्हा व्हेंटिलेटरवर उपचार सुरु

मुंबई: ज्येष्ठ गायिका गानसाम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची प्रकृती शनिवारी बिघडल्याने पुन्हा व्हेंटिलेटरवर (Vantilator) हलवण्यात आले असल्याची माहिती डॉ. प्रतीत समदानी यांनी प्रसार माध्यमांना दिली. मंगेशकर यांची रोगप्रतिकारशक्ती कमी झाली असल्याने शरीर औषधाला हवा तसा प्रतिसाद देत नाही. मंगेशकर यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) उपचार सुरू आहेत.

दरम्यान डॉ. प्रतीत समदानी (Dr Pratit Samdani) यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगेशकर यांना सुरुवातीपासूनच आयसीयूमध्ये (ICU) ठेवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती शनिवारी सकाळी पुन्हा खालावली. त्यामुळे त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर हलवण्यात आले.

लता मंगेशकर यांची रोगप्रतिकारशक्ती (immunity power) कमी झाली आहे. त्यामुळे त्यांच्यावर औषधाचा प्रभाव कमी होत आहे. शनिवारी अचानक त्यांची तब्येत पुन्हा खालावली. त्यामुळे त्यांना पुन्हा कृत्रिम श्वासोच्छवास सुरु करण्यात आला. मंगेशकर यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांची टीम त्यांच्यावर लक्ष ठेवून असल्याची माहितीही डॉ प्रतीत समदानी यांनी दिली.

दरम्यान, लता मंगेशकर यांना ८ जानेवारीला कोरोनाची (corona) लागण झाल्यानंतर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातच लता दीदींना न्यूमोनिया (pneumonia) झाल्याचे निदान झाले. तेव्हापासून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.

२२ जानेवारी रोजी लता मंगेशकर कोरोना आणि न्यूमोनियामुक्त झाल्या. त्यांची प्रकृतीही बरीच सुधारली होती. त्यामुळे व्हेंटिलेटर काढून टाकण्यात आले होते. पण त्यांचे वय पाहता त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. आज त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने वैद्यकीय पथकाने लता दीदींना पुन्हा व्हेंटिलेटरवर हलवले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here