@maharashtracity

बदल्यात देणार पालिकेचा भूखंड

मिठागर आयुक्त कार्यालयाच्या अडेलपणामुळे पंपिंग स्टेशनचे काम रखडले

२०१५ पासूनच्या पाठपुराव्याला अपयश ; खासगी भूखंडाची निवड

८ पैकी ६ पंपिंग स्टेशन उभारले माहुल व मोगरा पंपिंगचे काम रखडले

किंग सर्कल, चेंबूर, नेहरूनगर, रेल्वे मार्गाला दिलासा पुरापासून मिळणार

मुंबई: मिठागरे आयुक्त कार्यालयाच्या अडमुठेपणामुळे रखडलेल्या माहुल पंपिंग स्टेशनच्या कामाचा प्रश्न मार्गी लागला आहे. या कामासाठी खाजगी भूखंड उपलब्ध झाला असून भूखंड मालकाला पालिकेच्या मालकीचा भूखंड मोबदला म्हणून देण्यात येणार आहे.

मुंबईत दरवर्षी किंग्ज सर्कल, चेंबूर भागात पूरस्थिती (Flood like situation) निर्माण होण्यास कारणीभूत असलेल्या पावसाच्या पाण्याचा निचरा जलदगतीने करण्यासाठी माहुल पंपिंग स्टेशन (Mahul Pumping station) उभारणे पालिकेला गरजेचे आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून मिठागरे आयुक्त यांच्या कार्यालयाने नियोजित भूखंडाचा ताबा पालिकेला वेळेत न दिल्याने या पंपिग स्टेशनचे काम अनेक वर्षे रखडले होते.

मुंबईत २६ जुलै २००५ मधील पुरस्थितीची व त्यामुळे झालेल्या जीवित आणि वित्तीय हानीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी तज्ज्ञ समितीच्या शिफारशीनुसार सखल भागात साचलेल्या पावसाच्या (water logging) पाण्याचा निचरा मोठ्या प्रमाणात करण्यासाठी ८ पैकी ६ पंपिंग स्टेशन उभारण्यात पालिकेला यश आले आहे.

मात्र मोगरा व माहुल पंपिंगचे काम जागा व परवानग्याअभावी अनेक वर्षांपासून रखडले होते. माहुल पंपिंगसाठी मिठागरे आयुक्त यांच्या कार्यालयाकडून नियोजित भूखंड मिळण्यात वेळकाढूपणा झाल्याने या पंपिंग स्टेशनचे काम अनेक वर्षे रखडले होते.

मात्र आता माहुल पंपिंग स्टेशनच्या उभारणीसाठी अजमेरा बिल्डर यांच्या खासगी भूखंडाची जागा उपलब्ध होत असून त्या जागेच्या बदल्यात पालिका त्यास पर्यायी भूखंड देणार आहे. त्यामुळे आता त्या बिल्डरचे व पालिकेचे दोघांचेही समाधान होणार आहे.

वास्तविक, मुंबईत २६ जुलै २००५ रोजी अतिवृष्टी व मोठी समुद्र भरती यांमुळे पूरस्थिती निर्माण होऊन मोठया प्रमाणात जीवित व वित्तीय हानी झाली होती. या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नेमण्यात आलेल्या तज्ज्ञांच्या समितीने मुंबईत मोठ्या प्रमाणात सखल भागात साचणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा जलदगतीने व मोठ्या प्रमाणात करण्यासाठी ८ ठिकाणी पंपिंग स्टेशन उभारण्याची शिफारस करण्यात आली होती.

त्यानुसार पालिकेने ८ पैकी ६ ठिकाणी कोट्यवधी रुपयांचा खर्च करून पंपिंग स्टेशन उभारले. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून मोगरा व माहुल पंपिंग स्टेशनचे काम जागा व परवानग्या यांच्या अभावी रखडले.

माहुल पंपिंग स्टेशनसाठी पालिकेने निवडलेल्या भूखंडाचा ताबा गेल्या २०१५ पासून वारंवार पाठपुरावा करूनही देण्यात न आल्याने या पंपिंग स्टेशनचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले होते. त्यामुळे किंग्ज सर्कल व चेंबूर आदी सखल भागात दरवर्षी पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचून पुरस्थिती निर्माण होते व त्याचा त्रास मोठ्या प्रमाणात पादचारी व वाहन चालकांना होत आहे.

आता उशिराने का होईना पालिकेला अजमेरा या बिल्डरच्या (Ajmera Builder) मालकीचा मोठा भूखंड उपलब्ध होणार आहे. १५,५०० चौ. मी. जागेत माहुल पंपिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे.

या पंपिंग स्टेशनमुळे किंग सर्कल (Kings Circle), गांधी मार्केट, नेहरूनगर (Nehru Nagar), सिंधी सोसायटी चेंबूर (Chembur) आणि रेल्वे मार्ग पूरमुक्त होण्यास मदत होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here