@maharashtracity

धुळे: पदविकाधारक पशुवैद्यकांना व्यवसायिक कायदेशीर संरक्षण द्यावे, यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी शुक्रवारी दूध उत्पादक, पशुपालक, शेतकरी संघटनेच्यावतीने शहरातील क्युमाईन क्लबजवळ धरणे आंदोलन करुन निदर्शने करण्यात आली.

या आंदोलनाला शिवसेनेच्या आ. मंजुळा गावीत(MLA Manjula Gavit), माजी आ. राजवर्धन कदमबांडे (Rajwardhan Kadambande) यांनी पाठींबा दिला. 

या संदर्भात जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, राज्यात सेवेतील व सेवेबाहेरील पदवीधारक पशुवैद्यकांवर व्यवसायिक निर्बंध आणल्याने त्यांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरु आहे. परिणामी, त्याचा फटका राज्यातील ग्रामीण पशुवैद्यकीय सेवेवर झाला आहे. राज्यातील 80 टक्के भागात पशुवैद्यक सेवा देत आहे. मात्र, कामबंद आंदोलनामुळे आजारी जनावरांवर उपचार करणे कठीण झाले असुन त्याचा दुग्ध व्यवसायावरही विपरीत परिणाम झाला आहे.

यामुळे पदविकाधारक पशुवैद्यकांना व्यवसायिक कायदेशीर संरक्षण देणे व त्यांच्यासाठी स्वतंत्र कायदा करावा, गाव तेथे पशुसेवक, पशु वैद्यकांच्या नियुक्त्या कराव्यात, पशु वैद्यकीय सेवेसाठी सक्षम तांत्रिक पशु चिकित्सा शास्त्राचा संबंधी पदविका अभ्यासक्रम लागु करावा. दुग्धोत्पादन पदविका अभ्यासक्रम तात्काळ बंद करावा, पशु खाद्याच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करावी, दुधाची भाववाढ करावी, शेती मालाला हमी भाव मिळावा, केंद्राचे शेतकरी विरोधी कायदे रद्द करावेत या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदेालन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here