@maharashtracity

मुंबई महानगरपालिकेची माहिती

मुंबई: मुंबईतील १४ हजार ५०० हून अधिक सोसायट्यांमध्ये १०० टक्के लसीकरण झाले आहे. लसीकरण पूर्ण झालेल्या सोसायट्यावर पोस्टर लावण्याचा कल्पक उपकम पालिकेने सुरु केला आहे.

यातून मुंबईमधील तब्बल १४ हजार ५०० हजारांहून अधिक १०० टक्के लसीकरण पूर्ण केल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

मुंबईत एकूण सुमारे ३७ हजार सोसायट्या असून त्यापैकी २२ हजार सोसायट्या नोंदणीकृत आहेत. त्यापैकी १४ हजार ५०० सोसायटीमधील नागरिकांचे १०० टक्के लसीकरण झाले असल्याचे सांगण्यात आले.

महापालिकेने कोरोना प्रतिबंधक लसीकरण (vaccination) मोहिम वेगाने सुरू केली असून मुंबईत पहिला डोस १०० पूर्ण झाल्याचा दावा केला आहे. नागरिकांमध्ये लसीकरणाचे महत्व वाढावे म्हणून ज्या सोसायटीमधील १०० टक्के रहिवाशांनी लस घेतली आहे अशा सोसायट्यांवर १०० टक्के लसीकरण झाल्याचे पोस्टर पालिकेकडून लावले जात आहेत.

कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर ऑगस्टपासून निर्बंध शिथिल करण्यात आले होते. याच दरम्यान गणेशोत्सव, नवरात्री आदी सण साजरे केले. या दरम्यान रुग्णसंख्या वाढलेली नाही. ३०० ते ४०० च्या दरम्यान रुग्ण आढळून येत आहेत. रुग्णसंख्या वाढली नसली तरी कोरोनाचा धोका कायम आहे.

दिवाळीनंतर पुढच्या काही दिवसांत रुग्ण संख्येत भर पडेल असाही अंदाज आहे. त्यातच येत्या काही दिवसात ख्रिसमस आदी सण साजरे केले जाणार आहेत. यावेळी खरेदीसाठी बाजारात ही मोठ्या प्रमाणात गर्दी होते.

यामुळे डिसेंबरदरम्यान रुग्णसंख्या वाढू शकते अशी भीती काकाणी यांनी व्यक्त केली आहे. पण, जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण झाले तर तिसरी लाट टाळता येऊ शकेल असेही काकाणी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here