आजपासून लसीकरण पुन्हा सुरु

मुंबई: मुंबईसाठी (Mumbai) शुक्रवारी १ लाख ७० हजार ५९० एवढा साठा मिळाला असून पुन्हा सर्व लसीकरण केंद्रांवर (vaccination centres) लसीकरण केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. १ लाख ७० हजार ५९० एकूण लशीत १ लाख ५९ हजार ७३० कोव्हिशील्ड (Covishield) आणि १० हजार ८६० कोव्हॅक्सिनचे (Covaxin) डोस मिळाले आहेत.

दरम्यान, मुंबईत पुन्हा लसीकरण सुरु होणार असून शनिवार, सोमवार आणि मंगळवार या तीन दिवस पुरेल एवढा लसीचा साठा पालिकेला मिळाला आहे. आता प्रत्येक लसीकरण केंद्रांवर जाऊन लस घेता येणार आहे.

पुरेशा लसअभावी पालिकेने लसीकरण दोन दिवस बंद ठेवले होते. गुरुवार आणि शुक्रवारी मिळालेल्या डोसनंतर लसीकरण सुरु होईल असे पालिकेकडून सांगण्यात आले होते. त्यानंतर आता पालिकेला डोस प्राप्त झाले आहेत. त्यांचे वितरणही झाले आहे, अशी माहिती कार्यकारी आरोग्य अधिकारी डाॅ. मंगला गोमारे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here