@maharashtracity

मुंबई: कोरोनाच्या सावटाखाली (corona pandemic) असलेल्या मुंबईकरांच्या घरात, सार्वजनिक गणेशमंडपात विराजमान झालेल्या सात दिवसांच्या गणेश बाप्पाला आज मुंबईकरांनी समुद्र, खाडी, कृत्रिम तलावात विधिवत पूजाअर्चा करून निरोप दिला. (Ganesh visarjan)

‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’, ‘एक दोन तीन चार गणपतीचा जयजयकार’, असा जयघोष करीत आणि कोरोनाबाबत सरकार, पालिका यांनी घालून दिलेल्या नियमांचे पालन करून आपल्या लाडक्या बाप्पाला मुंबईकरांनी आज सातव्या दिवशी निरोप दिला.

गुरुवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत समुद्र, तलाव, खाडी, कृत्रिम तलाव या विसर्जन विसर्जन स्थळी कोरोनाच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून १ हजार २०४ सार्वजनिक व घरगुती गणेशमूर्तींचे आणि २४ गौरींचे विधिवत पूजाअर्चा करून विसर्जन करण्यात आले आहे.

यामध्ये, सार्वजनिक गणेशमूर्तींची संख्या २२, घरगुती गणेशमूर्तींची संख्या १ हजार १८२ एवढी होती. तर गणेशासोबत २४ गौरींचेही विसर्जन करण्यात आले आहे.

त्याचप्रमाणे, वरील एकूण विसर्जनातील मूर्तींच्या संख्येत कृत्रिम तलावात विसर्जित ३ सार्वजनिक गणेशमूर्तींचा, ५३८ घरगुती गणपतींचा आणि ११ गौरींचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here