@maharashtracity

आदीस्ते गावच्या सरपंच मीनाक्षी खिडबीडे यांचा खून

महाड: महाड तालुक्यातील आदीस्ते गावच्या सरपंच मीनाक्षी खिडबीडे यांचा मृतदेह आज दुपारी याच परिसरात जंगलात आढळल्याने आदीस्ते परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मीनाक्षी खिडबीडे या आदीस्ते गावच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) विद्यमान सरपंच (Sarpanch) होत्या.

मीनाक्षी खिडबीडे या सकाळी ११ वाजेच्या सुमारास चूलीसाठी लाकडे गोळा करण्यासाठी घरातून बाहेर पडल्या होत्या. दुपारी दोन वाजेच्या सुमारास रस्त्यापासून सुमारे शंभर मीटर अंतरावर मीनाक्षी यांचा मृतदेह गावातील एका व्यक्तीला दिसून आला. त्याने ही माहिती गावात सांगितली.

यावरून पोलीस पाटील यांनी महाड तालुका पोलीस ठाण्यात खबर देताच पोलीस पथकाने आदीस्ते गावात धाव घेतली. घटनास्थळी पंचनामा (Panchnama) करून रात्री मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन (Post Mortem) करण्यासाठी आणला. मृत महिलेच्या डोक्यात लाकडाचा फटका मारला असून रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढळल्याने मृत्यूबद्दल संशय (suspicious death) व्यक्त केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here