@maharashtracity

मुंबई: अतिवृष्टीमुळे झालेले प्रचंड नुकसान, मराठवाड्यात (heavy rain in Marathwada) झालेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या (farmers suicide), महिलांवरील वाढते अत्याचार अशा घटना राज्यात घडत असताना त्यावर बोलण्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (NCP spokesman Nawab Malik) हे आपल्या जावयाचा केविलवाणा बचाव करण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोमवारी केली. (BJP alleged Nawab Malik protecting his son in law)

भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते उपाध्ये म्हणाले, तंबाखू, गुटखा अशा पदार्थांच्या सेवनाच्या दुष्परिणामांची माहिती असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे वनस्पती असल्याचे सांगत मलिकांची री ओढत आहेत ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. राष्ट्रवादीच्या नेतृत्वाकडून अंमली पदार्थ विरोधात सुरु असलेल्या कारवाईत अडथळे निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु असल्याची टीकाही त्यांनी केली.

श्री. उपाध्ये म्हणाले की, अतिवृष्टीमुळे हतबल झालेले मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. याखेरीजही महाराष्ट्रासमोर अनेक प्रश्न आहेत. त्यावर सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्याने बोलणे अपेक्षित आहे.

Also Read: आश्रय योजनेचे प्रस्ताव मंजूर होताना भाजप नगरसेवक गप्प का होते?: शिवसेना

ते पुढे म्हणाले, मलिक हे आपल्या जावयाकडे हर्बल तंबाखू सापडली, अंमली पदार्थ सापडले नाहीत, यासारखी सफाई देण्यासाठी वारंवार पत्रकार परिषदा घेत आहेत. आपल्या जावयाचे केविलवाणे समर्थन करणाऱ्या मलिक यांना राज्यापुढे अन्य महत्वाचे प्रश्नच नाहीत असे वाटत असावे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांना तंबाखू, गुटखा वगैरे पदार्थांच्या दुष्परिणामांची जाणीव असताना तेही मलिक यांचीच री ओढत आहेत, ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे, अशी टीका उपाध्ये यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here