@maharashtracity

नगर जिल्हा रुग्णालय आग पकरणी

परिचारिकांना निलंबित करण्याने परिचारिका प्रक्षुब्ध

मुंबई: अहमदनगर जिल्हा रुग्णालयात लागलेल्या (fire incident in hospital) आगीला जबाबदार धरून तीन परिचारिकांचे निलंबित करण्यात आले. त्यामुळे महाराष्ट्र परिचारिका संघटनेकडून काळी फित लावून आंदोलन सुरु आहे. आग प्रकरणी चोर सोडून संन्याशाला फाशी दिली असल्याची भावना राज्यभरातील परिचारिकांमध्ये आहे.

त्यामुळे पुढील आदेश मिळेपर्यंत त्या काळ्या फिती लावून आंदोलन सुरु ठेवणार असल्याचे परिचारिका संघटनेकडून सांगण्यात आले.

अहमदनगर रुग्णालयातील आयसीयू कक्षात (ICU Ward) आग लागली होती. त्यावेळी आयसीयू वॉर्डात २० रुग्ण उपचार घेत होते. या आगीत ११ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

परंतु या घटनेला जबाबदार धरून आपत्कालीन परिस्थितीमध्ये जीवाची पर्वा न करता रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी धडपड करणाऱ्या एका परिचारिकेवर निलंबन, तर २ परिचारिकांच्या सेवा समाप्तीची कार्यवाही करून प्रशासन व शासनाने अत्यंत, अमानुषता दाखवली.

Also Read: पालिकेच्या प्रत्येक वॉर्डात मधुमेह क्लिनिक

चोर सोडून संन्याशाला फाशी का दिली जात आहे असा सवाल महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघटनेने विचारला आहे. परिचारिकांचा दोष नसून त्यांना निलंबित करणे योग्य नाही. त्यामुळे निलंबनाच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य परिचारीका संघटनेने राज्यस्तरीय आंदोलन घोषित केले आहे.

या आंदोलनात, महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना, शाखा सर जे. जे. समूह रुग्णालये सहभागी झाले आहे. शुक्रवारपासून सुरू झालेले काळी फित आंदोलन व निदर्शने रविवारपर्यंत करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या राज्य उपाध्यक्ष हेमलता गजबे यांनी सांगितले.

दोन दिवस केवळ आम्ही काळ्या फिती लावून काम केले आहे. रविवारी देखील काळ्या फिती लावून आंदोलन सुरु ठेवण्यात आले. मात्र, प्रशासनाने अन्याय झालेल्या परीचारिकांच्या बाबतीत योग्य निर्णय न घेतल्यास रुग्णसेवेवर देखील परिणाम होऊ शकतो, असे महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या राज्य उपाध्यक्ष हेमलता गजबे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here