@maharashtracity
१२ नोव्हेंबर जागतिक न्यूमोनिया दिन विशेष
मुंबई: न्यूमोनिया आणि फुफ्फुसाचा कर्करोग एकाच वेळी झाल्यास रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊन कर्करोगाच्या रुग्णांना न्यूमोनियाचा धोका जास्त असतो. न्यूमोनियामुळे कर्करोगाच्या रूग्णांमध्ये (cancer patients) गुंतागुंत वाढून मृत्यूचे प्रमाण देखील वाढते. म्हणून वेळेत उपचार केल्यास कर्करोगाच्या रुग्णांना न्यूमोनिया टाळता येऊ शकता असे जागतिक न्युमोनिया दिनी (World Pneumonia Day) तज्ज्ञ सुचवत आहेत.
न्यूमोनिया म्हणजे फुफ्फुस बाधित होऊन श्वास घेण्यास त्रास होतो. यात फुफ्फुसात पाणी तयार झाल्यास फंगस, विषाणू, आणि जीवाणू त्रास देतात. न्युमोनियाबाधित कर्करूग्णांमध्ये १० टक्के रुग्ण रूग्णालयात दाखल होतात. यातून गुंतागुंत वाढते.
यावर बोलताना सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. निनाद काटदरे (Dr Ninad Katdare) यांनी सांगितले की, कर्करूग्णांमध्ये रोग प्रतिकार शक्ती कमी झाल्याने न्यूट्रोपेनिया, फुफ्फुस विकृती आणि कुपोषण यासारख्या समस्या दिसून येतात. अशा वेळी उपचार करणाऱ्या डॉक्टराने केस स्टडी करुन न्युमोनिया आणि कर्करोग यातील फरक ओळखून उपचार करावेत.
सर्वसाधारण न्युमोनियामध्ये थकवा, खोकला, कफ, उलट्या, श्वासोच्छ्वास त्रास, छातीत दुखणे अशी लक्षण दिसून येतात. तशीच लक्षणे कर्करोगांमध्ये देखील असतात. त्यासाठी तज्ज्ञांकडून ठराविक चाचण्या करुन निदान केले पाहिजे.
फुफ्फुसाचा कर्करोग हळूहळू वाढतो. तर न्यूमोनियाची लक्षणे तीव्र असून पटकन दिसून येत असल्याचे डॉ. काटदरे म्हणाले. हा फरक जाणून घेण्यासाठी व निदानासाठी एचआरसीटी (HRCT) आणि पीईटीसीटीसारख्या (PETCT) आधुनिक व त्वरीत निदान करणाऱ्या पद्धती वापराव्यात.
शिवाय फुफ्फुसाचा कर्करोग आणि न्यूमोनिया एकाच वेळी अस्तित्वात असल्यास फरक करण्यासाठी सायटोलॉजी/कल्चर आणि बायोप्सीसह ब्रॉन्कोस्कोपीची देखील निदान पद्धती आहे.