@maharashtracity

मानेच्या दुखण्याने मुख्यमंत्री रुग्णालयात

मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackarey) हे बुधवारी कॅबिनेटनंतर ( Cabinet meeting) एन. एच. रिलायंन्स हॉस्पिटलमध्ये ( N H Reliance Hospital) दाखल झाले. मानेच्या दुखण्याकडे दुर्लक्ष झाल्याने ठाकरे यांनी वैद्यकीय सल्ल्यानुसार हॉस्पिटलमध्ये दाखल होऊन उपचार घेण्याचा निर्णय घेतला.

शुक्रवारी त्यांच्या मणक्यावर शस्त्रक्रिया (Spine surgery) होणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान ठाकरे यांच्यावर शुक्रवारी सकाळी सात वाजता शस्त्रक्रिया होणार असून शनिवार रविवार आराम केल्यानंतर सोमवारी त्यांना घरी सोडण्यात येईल, अशी माहिती मिळत आहे.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना १९ व्या मजल्यावर विशेष कक्षात ( Special ward) दाखल केले आहे. त्यांच्यावर कोणतीही वैद्यकीय चाचणी केली जाणार नसल्याचे सांगण्यात आले. गुरुवारी वरिष्ठ अर्थो सर्जन ( Senior artho Surgen) यांच्या सल्ल्याने विविध वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या.

ठाकरे यांच्या मानेचे दुखणे बळावले असून त्यावर रुग्णालयात दाखल होणार असल्याचे ठाकरे यांनी जनतेला केलेल्या आवाहना दरम्यान सांगितले.

Also Read: मुंबईकर मधुमेहाने त्रस्त

डॉक्टरांनी मानेच्या दुखण्याकडे दुर्लक्ष न करता रुग्णालयात दाखल होवून उपचार घ्या असे सुचवल्याने दोन तीन दिवस रुग्णालयात उपचार घेणार आहेत. एच. एन. रिलायन्स हॉस्पिटलमध्ये डॉ. शेखर भोजराज ( Dr. Shekhar Bhojraj) मुख्यमंत्र्यांवर उपचार करणार असल्याचे समजत आहे.

आगामी दोन तीन दिवस रुग्णालयात दाखल होऊन उपचार करुन घेणार असल्याचे सांगण्यात आले. जनतेच्या आशिर्वादाने तब्येत लवकरच बरी होईल अशी खात्री ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here