@maharashtracity

धुळे: शिरपूर येथील प्रशिक्षण केंद्राचे दोन सीटर असलेले छोटे विमान वर्डी ता. चोपडा जि. जळगाव येथील पर्वत रांगेत जंगलात कोसळले. या दुर्घटनेत एक पायलट ठार तर प्रशिक्षणार्थी महिला पायलट जखमी झाले.

शिरपूर प्रशिक्षण केंद्राचे हे दोन आसनी छोटे विमान नियमितपणे हवाई प्रशिक्षण सुरु असताना पर्वतरांगेतील दाट झाडीमध्ये अचानक कोसळले. ही घटना शुक्रवारी दि. १६ जुलै रोजी दुपारच्या वेळी घडली.

अपघात झाल्यावर त्या परिसरातील आदिवासी बांधव विमान आवाजाने दिशेने गेले व त्यांनी मदतकार्य सुरू केले. यात पायलट जागीच ठार झाले होते. टेकनम दोन सीटर पी 2008 जेसी क्रमांक व्हीटी-बीआरपी विमान हे अंदाजे 300 तास हवाई सफर केले होते.

या घटनेतील मयत पायलट कॅप्टन नूरुल अमीन यांना एकूण 500 तास विमान चालविण्याचा अनुभव होता. यातील प्रशिक्षणार्थी पायलट अंशिका गुर्जर हिला 113 तासांचा 58 तास सोलो फ्लाइंगसह अनुभव होता. एअरक्राफ्ट कंपनीचे नाव टेकनम TECNAM असून विमानाची नोंदणी व्हीटी-बीआरपी (सिंगल इंजिन), एअर क्राफ्ट नाव – टेकनम पी 2008 जेसी, उत्पादन वर्ष – 2019 आहे.

दुर्दैवाने या अपघातात कॅप्टन नुरुलमीन (बंगळुरू) हा आपल्या प्राणास मुकला असून प्रशिक्षणार्थी अंशिका गुजर (खरगोण, म. प्र.) या जखमी पायलटला मुंबई येथे उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे.

घटनेची माहिती समजताच माजी शिक्षणमंत्री आमदार अमरिशभाई पटेल, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी तातडीने मदत कार्य करण्याच्या मुंबईहून सूचना दिल्या. त्यानुसार एस. व्ही. के. एम. शिरपूर कॅम्पचे मुख्य लेखापाल व प्रशासक राहुल दंदे हे तातडीने घटनास्थळाकडे निघाले.

जखमी अंशिका गुजर हिला चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या ठिकाणी तिची विचारपूस करून शिरपूर येथून अत्याधुनिक ॲम्बुलन्स ची व्यवस्था करून तिला तातडीने मुंबईला रवाना करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here