@maharashtracity

राज्यात २ कोटी ७६ लाख पूर्ण लसीकरण

मुंबई: राज्यात बुधवारी ९ कोटी नागरिकांच्या लसीकरणाचा विक्रम झाला असून आतापर्यंत २ कोटी ७६ लाख नागरिक संपूर्ण सुरक्षित झाले असल्याची माहिती आरोग्य विभागाचे सचिव डाॅ. प्रदीप व्यास (Dr Pradip Vyas) यांनी दिली.

दरम्यान मुंबईत आतापर्यंत ९५ टक्के नागरिकांचा पहिला डोस पूर्ण झाला असल्याचे सांगण्यात आले. (95 per cent Mumbaikar have been given first dose of covid vaccine)

२ कोटींहून अधिक नागरिकांचे पूर्ण लसीकरण करुन महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे. इतर राज्यांच्या तुलनेत राज्यात आतापर्यंत सर्वाधिक लसीकरण झाले आहे.

संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी किंवा त्या लाटेची दाहकता कमी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने लसीकरण मोहिमेला गती दिली. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत बुधवारपर्यंत ९ कोटी नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. त्यात २ कोटींहून अधिक नागरिकांचे पूर्ण लसीकरण (Fully vaccinated) करण्यात आले आहे.

राज्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला वेग आला असून आरोग्य विभागाची यंत्रणा लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी युद्धपातळीवर परिश्रम घेऊन लसीकरणाचे नवे विक्रम करत आहे.

मुंबईत लक्ष्यित १८ वर्षांवरील ९२ लाख ३६ हजार ५४६ नागरिकांपैकी ८८ लाख १७ हजार ५३८ नागरिकांचा पहिला डोस म्हणजेच जवळपास ९५.४६ टक्के नागरिकांनी पहिला डोस घेतला. तर, ५३.६५ टक्के म्हणजेच ४९ लाख ५५ हजार ५१० नागरिक दोन्ही डोस घेऊन सुरक्षित झाले आहेत. राज्याच्या इतर जिल्ह्यांपैकीही मुंबईत सर्वाधिक लसीकरण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here