By संतोष मासोळे

@SantoshMasole

धुळे: टाळेबंदी उठताच आज धुळे जिल्ह्यात ढगांच्या प्रचंड गडगडाटासह मान्सूनचे आगमन झाले. प्रामुख्याने पावसाळ्यात खरेदी,विक्री होणाऱ्या वस्तूंच्या व्यवसायाला काहीशी चालना मिळेल, अशी अपेक्षा या व्यावसायिकांनी व्यक्त केली.

आज दुपारी चार नंतर उकाडा वाढला आणि सायंकाळी जोरदार सरींना सुरुवात झाली. यामुळे अनेकांची धांदल उडाली.

गेल्या आठवड्यापासून दिवसभरात ऊन, सावली आणि ढगाळ वातावरण यामुळे वाढलेला असह्य उकाडा अशा बदलत्या वातावरणाला धुळेकर वैतागले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने केलेले सर्वच क्षेत्रातील ‘लॉकडाऊन’मधून गेल्या दोन दिवसांपूर्वीच सायंकाळी पाच वाजेपर्यंत सूट मिळाल्याने लहान – मोठ्या व्यावसायिकांनी मोठ्या उत्साहाने आपले पारंपारिक व्यवसाय सुरू केले.

आज दुपारनंतर मात्र मान्सूनच्या जोरदार पावसाने अनेकांची धांदल उडाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here