@maharashtracity

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई: शाळा सुरु झाल्यावर काळजी घेत किशोरवयीन मुलांमध्ये लसीकरण (vaccination to children) केल्यास या वयोगटातील लसीकरणाला चालना मिळेल अशी आशा सार्वजनिक राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी गुरुवारी व्यक्त केली.

मुलांच्या शिक्षणावर तसेच मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी म्हणून विविध संघटनांकडून शाळा सुरु करण्याची मागणी करण्यात येत होती. शिवाय टास्क फोर्सकडून (Task Force) देखील हिरवा कंदील मिळाल्याने २४ जानेवारीपासून शाळा सुरु (reopening of school) करण्यात येत आहेत.

यावर बोलताना टोपे म्हणाले की लसीकरणात मागे असलेल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, आयुक्त यांनी लसीकरणावर भर दिला पाहिजे. अशा जिल्ह्यांना लसीकरणात पुढे आणलेच पाहिजे.

तसेच २४ जानेवारी रोजी सर्व शाळा खुल्या करण्यात येत आहेत. स्थानिक जिल्हाधिकारी, शिक्षण अधिकारी यांच्या सल्ल्याने तसेच पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनाने कोणत्या शाळा सुरु करावयाच्या याबाबत सुचवावे. मात्र बऱ्यापैकी शाळा सुरु कराव्या असा मंत्रीमंडळात निर्णय घेण्यात आला आहे.

शाळा सुरु झाल्यावर १५ ते १८ वयोगटातील लसीकरणाला चालना मिळू शकते, असे टोपे यांनी सांगितले. किशोरवयीन विद्यार्थ्यांना काळजी घेऊन लसीकरण करण्यात हरकत नसल्याचे टोपे यांनी स्पष्ट केले. आतापर्यंत किशोरवयीन मुलांमधील ५० टक्क्यांपर्यंत लसीकरण झाले असून शाळांमधील लसीकरणाने गती वाढू शकते, असेही त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here