अयोध्या

अयोध्येच्या राम मंदिरात विराजनमान होण्यासाठी रामलल्ला तयार आहेत. जानेवारी महिन्यात मंदिराचं उद्घाटन होणार आहे. विशेष म्हणजे येथे स्थापित होणारी मूर्ती दोन मुस्लीम शिल्पकारांनी तयार केली आहे. अयोध्येत होणाऱ्या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून भारतीय क्रिकेटर विराट कोहली, व्यावसायिक मुकेश अंबानी सारखी अनेक दिग्गज व्यक्तिमत्तव सामील होणार असल्याची माहिती आहे.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, येथील मूर्ती बंगालच्या उत्तर २४ परगनाचे मोहम्मद जमालुद्दीन आणि त्यांचा मुलगा बिट्टू यांनी तयार केली आहे. मंदिराच्या परिसरात सामील होणाऱ्या अनेक मूर्ती त्यांनी तयार केली आहे. रामल्लाच्या मूर्तीपूर्वी त्यांनी देवी दुर्गाची मूर्तीही तयार केली आहे. पिता-पुत्राची जोडी गेल्या अनेक काळापासून शिल्पकार म्हणून काम करीत आहेत.

जमालुद्दीन यांनी सांगितलं की, धर्म ही खासगी बाब आहे. आपल्या देशात अनेक धर्म मानणारे लोक राहतात. देशाय जातीयवाद पसरवला जात असताना आपण एकत्र राहायला हवं. एक कलाकार म्हणून बंधुतत्वाची संस्कृती रुजवणं हा माझा संदेश आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते हिंदू देवी-देवतांची मूर्ती तयार करीत आहेत. जमालुद्दीन यांनी सांगितलं की, टिकावं या दृष्टीने सध्या मातीऐवजी फायबरच्या मूर्ती पसंत केल्या जात आहेत. त्यांनी सांगितलं की, एक लाइफ साइट मूर्ती तयार करण्यासाठी २.८ लाखांचा खर्च येतो.

बिट्टूंनी पुढे सांगितलं की, एक मूर्ती तयार करण्यासाठी ३० ते ३५ जणांची टीम लागते. सोबतच यासाठी दीड महिन्याचा कालावधी लागतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here